सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : शुक्रवार १५ जानेवारी रोजी सांगोला तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या ५३ ९ जागांसाठी २६५ मतदान केंद्रावर १ लाख ६४ हजार ०४४ मतदानाचा हक्क बजावणार आहेत . मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १ हजार ४५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली .
सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू असून मेथवडे , वाटंबरे , तिप्पेहाळी , गायगव्हाण , चोपडी या पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत . तर इतर १ ९ ग्रामपंचायतीच्या ६ ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे . आता ५६ ग्रामपंचायतीच्या ५३ ९ जागांसाठी १२१० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून आपले नशीब आजमावत आहेत .
ग्रामपंचायतीसाठी शुक्रवार १५ जानेवारी रोजी २६५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे . मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी २६५ केंद्राध्यक्ष , २६५ सहाय्यक केंद्राध्यक्ष , ५३० मतदान अधिकारी , २६५ शिपाई तसेच २५ राखीव केंद्राध्यक्ष , २५ , राखीव सहाय्यक केंद्राध्यक्ष , ५० राखीव मतदान अधिकारी , २५ राखीव शिपाई अशी १४५० अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे.
मतदान केंद्रावर २६५ कंट्रोल युनिट , २६८ बॅलेट युनिट मशीन उपलब्ध करून देण्यात : आलेल्या आहेत . मतदान केंद्रावर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास मतदान प्रक्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी कंट्रोल युनिट , बॅलेट मशिनचे २५ सेट राखीव ठेवण्यात आले आहेत . मतदान केंद्रावर मतदान अधिकारी ,कर्मचारी , कंट्रोल युनिट , बॅलेट मशिन पोहोच करण्यासाठी १८ एसटी बसेस , १८ बस , २ जीप व मतदान केंद्रांना भेटी देण्यासाठी ४ झोनल ऑफिसरची वाहने अशी ४२ वाहनांची सोय केली आहे . तालुक्यातील कोळा , जवळा , महूद , वासूद , अकोला , घेरडी ही ६ गावे संवेदनशील जाहीर केली असल्याने प्रशासनाने या गावांवर लक्ष केंद्रित केले आहे .
आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी जीपीएस यंत्रणेसहित तीन भरारी पथके तैनात केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली आहे .


0 Comments