सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) सांगोला तालुक्यातील ७६ पैकी | ६१ म्हणजे एकूण ८० टके ग्रामपंचायतींच्या निवडणूका होत आहे . ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांशी प्रत्यक्षात जास्त संपर्क होणार आहे . त्यामुळे या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
ग्रामपंचायत निवडणुकीत | मतदारांचा थेट संपर्क होत | असल्याने निवडणूक काळात कोरोनाचा संसर्ग कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे .विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची | निवडणूक निवडणूक यंत्रणेद्वारे यशस्वीरित्या पार पडल्याने निवडणूक विभागाला कोरोना काळातील निवडणुकीचा अनुभव मिळाला आहे . मात्र ग्रामपंचायत | निवडणूक यापेक्षा वेगळी व प्रत्येक गावाचा थेट असणारी राहणार आहे . त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसमोर कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान देखील तेवढेच तगडे राहणार आहे . तालुक्यातील ७६ पैकी ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत . त्यापैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून ६५ सदस्यांची निवड देखील बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . त्यामुळे ५६ ग्रामपंचायतीच्या ६०४ जागांसाठी प्रचार सुरू सुरू झाला आहे . तालुक्यातील जवळपास ८० टके गावांमध्ये निवडणुका होत असून या निवडणुकीसाठी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या प्रचाराच्या निमित्ताने कॉर्नर सभा , बैठका ,प्रत्येकांच्या गाठीभेटी होणार असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे . प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंधित प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे . ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाची टकेवारी अधिक राहत असल्याने कोरोना संसर्ग काळात निवडणुकीला कुठेही गालबोट लागू नये यासाठी निवडणूक विभाग प्रयत्न करत आहे . ग्रामपंचायत निवडणुकीत ३१० मतदान केंद्रावर मतदानाच्या वेळी गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्राला सातशे ते आठशे मतदार जोडले आहेत . त्यामुळे मतदान केंद्राच्या संख्येत भर पडणार आहे . याशिवाय संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदार केंद्राची माहिती घेण्यात येत असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले आहे .


0 Comments