जनावरांना रस्त्यावर मोकाट सोडणे मालकांना पडणार महागात
। अहमदनगर । दि.1 जानेवारी । शहरातील विविध भागात अनेकजण आपले जनावरे दिवसभर जनावरे मोकाट सोडतात यामधुन काही वेळेस अपघात होता. मात्र, आता अशा मोकाट जनावरांवर थेट कारवाई होणार आहे.
अनेकदा शहराच्या रस्त्याच्याकडेला किंवा रस्त्याच्या मधोमध मोकाट जनावरे बसलेली किंवा उभे दिसतात. तसेच अनेकदा मोकाट जनावरांचा प्राण वाचताना अपघात घडलेले आहे. मात्र, आता रस्त्यावर अशी मोकाट जनावरे सोडणे त्या जनावरांच्या मालकांना चांगलेच महागात पडू शकते.
कारण मनपा प्रशासनाकडून यापुढे आता मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यामातून जाहीर केले आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यावर व शहरातून जाणार्या सर्वच महामार्गावर मोकाट जनावरांचे कळप फिरत असतात.
अनेकवेळा या जनावरांची आपसात झुंज लागून या जनावरांच्या घोळक्यात वाहनचालक जखमी झाले आहे. आता मात्र, महापालिकेच्या कोंडवाडा विभागाच्या या विभागाने जर रस्त्यावर मोकाट जनावर पकडले व त्यानंतर जर संबंधित मालकाने जागेवरच जनावर सोडवले तर संबंधितास त्या जनावरास केल्या जाणार्या दंडाच्या पाचपट दंड वसूल करण्यात येणार आहे.
पथकाने पकडून आणलेल जनावरे जर सात दिवसांच्या आत त्या मालकांनी सोडवून नेले नाही तर या जनावरांचा लिलाव केला जाणार आहे. तरीपण यापुढे कोणीही रस्त्यावर मोकाट जनावरे सोडू नयेत असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
जनांवराबाबत प्रति दिनी पुढीलप्रमाणे दंड आकरण्यात येणार आहे.
1. बकरी, मेंढी, करडु, बोकड इ. रु.280/-प्रति जनावर
2. गाढव,डुक्कर, वासरु रु.280/-प्रति जनावर
3. घोडा, गाय, गोर्हा, बैल,खेचर,घोडा रु.360/-प्रति जनावर
4. उंट, म्हैस, रेडा रु.920/-प्रति जनावर
5.हत्ती रु.1020/-प्रति जनावर


0 Comments