google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिवसेनेला सोलापुरसाठी मिळेना संपर्कप्रमुख ! विधानसभेनंतर आमदार तानाजी सावंत संपकांबाहेर ; शंभुराजे नवे संपर्कमंत्री

Breaking News

शिवसेनेला सोलापुरसाठी मिळेना संपर्कप्रमुख ! विधानसभेनंतर आमदार तानाजी सावंत संपकांबाहेर ; शंभुराजे नवे संपर्कमंत्री

 सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक आमदार शिवेसनेचेच निवडून येतील , अशी ग्वाही आमदार तानाजी सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिली . मात्र , जिल्ह्यातील सहापैकी सांगोला वगळता एकाही ठिकाणी शिवसेनेला यश मिळाले नाही


. हा पराभव जिव्हारी लागला , त्यातच राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागेल ही त्यांची आशाही फोल ठरली . तेव्हापासून संपर्कप्रमुख तानाजी सावंत संपर्काबाहेरच असून त्यांचे बंधू जिल्हा सन्मवयक हेही दिसले नाहीत , अशी चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये आहे .पक्षप्रमुखांकडेच आहे राज्याची दोरी ; तरीही वाढतेय पदाधिकाऱ्यांमध्ये दरी राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे आहे . पक्षप्रमुखच मुख्यमंत्री झाल्याने भाजप - शिवसेनेची सत्ता असताना अडगळीला पडलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांमधील उत्साह वाढला . मात्र , जिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुखांचे काम , महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी पूर्णवेळ संपर्कप्रमुख असायला हवा . त्यांच्या माध्यमातून प्रत्येक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भागातील नागरिकांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी मोठी मदत होते . मात्र , संपर्कप्रमुखच संपर्काबाहेर असून जिल्हा समन्वयकही सोलापुकरडे फिरकत नसल्याने पदाधिकाऱ्यांनी नव्या संपर्कप्रमुखांची मागणी केल्याची चर्चा आहे . मात्र , अद्याप नवा संपर्कप्रमुख नियुक्त करण्याबाबत काहीच हालचाली दिसून येत नाहीत .तर राज्यात शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन केली . भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात दोन्ही काँग्रेस यशस्वी ठरले . शिवसेनेचे पक्षप्रमुखच मुख्यमंत्री केल्याशिवाय पक्षातील नाराजी दूर होणार नाही , असा विश्वास दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांना होता . त्यानुसार उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले , पर्यटन मंत्री तथा अन्य विभागाचे मंत्री म्हणून तानाजी सावंत यांची चर्चा होती . मात्र , आदित्य ठाकरे यांना मंत्रिपद दिल्याने सावंत यांचा भ्रमनिराश झाला . तत्पूर्वी , मोहोळ , करमाळा , शहर मध्यमध्ये उमेदवारी देताना बंडखोरी होणार नाही , याची माहिती असतानाही सावंतांनी नाराजांची नाराजी दूर केली नाही . दुसरीकडे बार्शीतून राष्ट्रवादीचे माजी मंत्री दिलीप सोपल हे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात असतानाही त्यांना पराभव स्वीकारावा लागला . माढा मतदारसंघात सावंत यांच्या कुटुंबियांचे राजकारण असूनही तिथे पक्षाला यश मिळाले नाही . त्यानंतर उमेदवारी देताना सावंतांनी मनमानी केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केली . अशा परिस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करुन त्यांच्या पुन्हा समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीने संपर्कप्रमुख व जिल्हा समन्वयकांच्या माध्यमातून प्रयत्न अपेक्षित होते . मात्र , तसे प्रयत्न न झाल्याने राज्यात सत्ता असतानाही पदाधिकाऱ्यांना सत्तेचा फिल येत नसल्याचे चित्र आहे .संपर्कमंत्रीही महिन्यातच बदलला संपर्कप्रमुख आणि जिल्हा समन्वयक हे दोघेही संपर्काबाहेर गेल्यानंतरही पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढावा , पक्षसंघटन मजबूत व्हावे , या हेतूने पक्षप्रमुखांनी संपर्कमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांची नियुक्त केली . मात्र , नगर जिल्ह्यातच रमलेले गडाख यांना सोलापुरसाठी वेळच नसल्याने पक्षाने ही जबाबदारी गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे सोपविली . त्यांनी नुकताच दौरा केल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वजण ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत

Post a Comment

0 Comments