google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूर येथील छत्रपती चषकमध्ये राजमाता क्रिकेट अकॅडमीचे घवघवीत यश ओम आनंदा माने ठरला सामनावीर

Breaking News

पंढरपूर येथील छत्रपती चषकमध्ये राजमाता क्रिकेट अकॅडमीचे घवघवीत यश ओम आनंदा माने ठरला सामनावीर

पंढरपूर येथील छत्रपती चषकमध्ये राजमाता क्रिकेट अकॅडमीचे घवघवीत यश

ओम आनंदा माने ठरला सामनावीर

पंढरपूर या ठिकाणी स्वेरीमध्ये छत्रपती चषक या नावाने क्रिकेट स्पर्धा चालू असून कालचा सामना हा राजमाता क्रिकेट अकॅडमी सांगोला विरुद्ध समर्थ क्रिकेट क्लब परभणी या दोन संघामध्ये खेळला गेला होता. यामध्ये राजमाता क्रिकेट अकॅडमी सांगोला या संघाने 9 विकेट राखत एकतर्फी विजय मिळविला. या विजयामुळे राजमाता क्रिकेट अकॅडमी हा संघ सेमी फायनलमध्ये पोहचला आहे. 

या सामन्यामध्ये ओम माने हा खेळाडू सामनावीराचा मानकरी ठरला असून त्याने 5.5 ओव्हरमध्ये 9 धावा देऊन 5 विकेट मिळवत 2 ओव्हर निर्धाव टाकल्या आहेत. तसेच अष्टपैलू खेळी करत ओंकार गरांडे यांनी 3 विकेट घेऊन नाबाद 52 धावा काढल्या आहेत. विशाल मिसाळ आणि हर्षराज जगताप या खेळाडूंनीही सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

या खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून प्रशांत काशीद सर, अक्षय जाधव सर, रणजित गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments