google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नंदेश्वर ग्रामपंचायतीत सुनिल कसबे यांचा उमेदवार या रेखा कसबे निश्चित

Breaking News

नंदेश्वर ग्रामपंचायतीत सुनिल कसबे यांचा उमेदवार या रेखा कसबे निश्चित

 मंगळवेढा / प्रतिनिधी मंगळवेढा । तालुक्यातील नंदेश्वर ग्रामपंचायत निवडणूक लढवणार म्हणून अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले सुनिल कसबे सर यांचा उमेदवार निश्चित झालेला असून निवडणूकीचा अर्ज भरण्याच्या व प्रचाराच्या तयारीला लागले आहेत .


नंदेश्वर ग्रामपंचायतीची निवडणूक सध्या रंगतदार व चुरशीची होणार असून वॉर्ड क्रमांक ५ , नंदेश्वर गाव व गावठाण हद्दीत सुनिल कसबे सर यांनी या अगोदरच कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असे जाहीर केले होते . परंतु वॉर्डमध्ये महिला एस.सी.चे आरक्षण पडल्याने त्यांनी पत्नी रेखा सुनिल कसबे यांनाच उमेदवार म्हणून निश्चित केले आहे . लवकरच कागदपत्रांची पुर्तता करुन महिला उमेदवार म्हणून रेखा कसबे यांचा ऑनलाईन अर्ज दाखल करुन कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणूक लढवणार असल्याचे पुन्हा एकदा त्यांनी सांगितले आहे .

Post a Comment

0 Comments