घेरडी : निवडणूक आयोगाने सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे . येत्या काही दिवसात घेरडी ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे . प्रत्येक वेळी ही निवडणूक प्रचंड अटीतटीची होत आली आहे . यंदाच्या निवडणुकीबाबत घेरडी परिसरातील अनेक युवकांना असे वाटते की , ही निवडणूक बिनविरोध व्हावी गेल्या आठ महिन्यापासून कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबांना त्रास सहन करावा लागला आहे .
त्याच बरोबर परतीच्या पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात फळबागांचे नुकसान झाले आहे . या सगळ्या परिस्थितीमुळे यंदाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी घेरडी येथील शिवाजीराव जावीर यांची मागणी आहे . निवडणूक बिनविरोध झाली तर शासनाकडून गावासाठी बक्षीस मिळेल त्याच बरोबर गावच्या विकासासाठी स्वखर्चातून घेरडी येथील शिवाजीराव जवीर हे २ लाख ५१ हजार रुपयांचा विशेष निधी देणार आहेत . यामुळे गावातील | सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी | याबाबत गांभीर्याने विचार करून | येणारी निवडणुक बिनविरोध | करण्यासाठी प्रयत्न करावे . अशी | मागणी शिवाजीराव जवीर यांनी | केली आहे . त्याचबरोबर घेरडी ग्रामपंचायत निवडणूक | बिनविरोध होण्यासाठी व | राजकीय पक्षातील पदाधिकारी | कोणता निर्णय घेतात याकडे | सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .


0 Comments