सांगोला ( प्रतिनिधी ) : आ.शहाजीबापू पाटील यांच्या फंडातून सुमारे ७० लाख ५८ हजार रुपये खर्चुन सांगोला शहरातील विविध १२ ठिकाणी व तालुक्यातील २८ गावे वाड्या वस्त्यांसह , धार्मिकस्थळे आदि परिसरात सुमारे ४० हायमास्ट दिवे बसविण्यास मंजुरी मिळाली असून परिसर प्रकाशमय केला जाणार आहे . दरम्यान श्री दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर वझरे गावात हाय मास्ट दिवा बसून परिसर प्रकाशमय केल्याने ग्रामस्थांतून आनंद व्यक्त होत आहे .
सांगोला विधानसभा मतदार संघाचे विधानसभा सदस्य आ . शहाजीबापू पाटील यांच्या सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील फंडातून यापूर्वीच सुमारे ५० लाख रुपये निधीतून तालुक्यातील व पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटातील प्रा . आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना पीपीई कीट मास्क , आदि साहित्याचे वाटप केले असून अनेक रस्त्याच्या कामांसाठी निधी खर्च केला आहे आता त्यांच्या फंडातून व निया जन अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या नियोजनातून सांगोला तालुक्यातील २८ गावे , वाड्या वस्त्यांसह धार्मिक स्थळे , चौक आदी ठिकाणी तसेच सांगोला शहरातील १२ विविध ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यास मंजुरी मिळाली आहे . ठेकेदाराकडून सदर ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्याचे काम सुरू झाले असून वझरे गावात हायमास्ट दिवा बसवून कार्यान्वित केला आहे . लवकरच उर्वरित मंजुरीच्या ठिकाणी हायमास्ट दिवे बसवून रात्रीचा अंधार दूर केला जाणार असल्याचे आ . शहाजीबापू पाटील यांनी सांगितले .कार्यालय समोर 9 आ.शहाजीबापू पाटील यांच्या | ( २०२० - २१ ) फंडातून सांगोला तालुक्यातील कडलास गाम पंचायत कार्यालय समोर अकोला- सिद्धनाथ मंदिर परिसर , वासुद हनुमान मंदिर , वाटंबरे -माळवाडी -चिणके रोड , आजनाळे -दिवाणमळा लिगाडेवाडी- मारुती मंदिरासमोर , यलमार मंगेवाडी- खंडोबा मंदिरासमोर , चिणके - डॉ . बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर समोर , वझरे- दत्त मंदिर समोर , चिकमहूद -रवी जाधव किराणा स्टोअर्स जवळ , पाचेगाव खुर्द -मिसाळवाडी , वाढेगाव - शिवाजी चौक , आलेगाव हनुमान मंदिरासमोर बाबरवाडी , मेडशिंगी -लेंडवे पाटील वस्ती घेरडी- साताप्पा देवस्थान , सोनंद- काशीद वाडी- भोसले वस्ती व मुस्लिम गल्ली संतोष साळुंखे कोळा सिद्धनाथ नगर तुकाराम नगर रोड व खंडागळे वस्ती , हातीद ग्रामपंचायत कार्यालयासमोर , तिप्पेहळी- एकनाथ नरळे वस्ती कोळे रोड , एखतपुर जिव्हाळा नगर , जवळा नारायण देव मंदिर परिसर व गावातील बाजार पटांगण , मांजरी- जुनी चावडी कट्ट्याजवळ , शिवणे- मारुती मंदिर चौक , वाकी घेरडी झेडपी शाळेजवळ शिंदे वस्ती , मेथवडे -एसटी स्टैंड समोर मेथवडे फाटा , सांगोला टेलिफोन ऑफिस जवळ , आरक्षण क्रं . ४७ चिंचोली रोड बगीच्या , कुंभार गल्ली , मुंगी पीर दर्गा , कचेरी रोड गणेश लॉजसमोर , अंबिका मंदिर , नेहरू चौक , मुस्लिम स्मशानभूमी वाढेगाव रोड , पाटील वस्ती , परीट गल्ली , सटवाई मंदिर , कोष्टी गल्ली असे एकूण ४० हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत


0 Comments