विधानसभेला शेकाप बरोबरच होतो आणि ग्रामपंचायत निवडणुकीत पण राहणार : आर. पी.आय. नगरसेवक सुरज दादा बनसोडे
जर आर.पी.आय ( A)कार्यकर्त्यांना संधी दिली तर
सांगोला/प्रतिनिधी:
सांगोला तालुक्यांमध्ये 61 ग्रामपंचायतीच्या निवडणुक लागल्याने गावपातळीवर प्रत्येक पक्षाच्या हालचाली सुरु आहेत. काही गावांमध्ये सर्वच पक्ष एकत्रित येऊन ग्रामपंचायत बिनविरोध करण्याच्या तयारी मध्ये आहेत. परंतु आर.पी.आयच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. वास्तविक पाहता शेतकरी कामगार पक्षाला पक्षाचा आदेश डावलून सर्वतोपरी मदत केली. आणि निवडणूक थोडक्यात गेली. तालुक्यातील सर्वच पक्ष एकीकडे असताना दलित, मुस्लिम अल्पसंख्यांक या सर्व समाजाने शेतकरी कामगार पक्षासाठी कुठल्याही परिणामाचा विचार न करता सर्वतोपरी सहकार्य केले. त्यामुळे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने आरपीआयला सत्तेत सामावून घ्यावे. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ला वेगळा विचार करावा लागेल. ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय जागेवर विशिष्ट घटकाचे आपसात मिटवले असून, बौद्ध समाजात जाणीवपूर्वक मतभेद व इच्छुकांना जास्त प्रभावित केले आहे. त्यामुळे बौद्ध समाजातील उमेदवार बिनविरोध निघणे अवघड आहे. तरी आपण तो उमेदवार बिनविरोध कसा निघेल याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा. परंतु शेतकरी कामगार पक्षाने ह्या प्रक्रियेत विशेष भाग घेऊन आरपीआयच्या म्हणजेच आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, तरच आपण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षा बरोबरच राहणार असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सरचिटणीस व सांगोला नगरपरिषदेचे नगरसेवक सुरज दादा बनसोडे यांनी व्यक्त केले आहे.
चौकट
ग्रामीण भागातील शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक प्रमुख नेत्याने विधानसभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने केलेल्या सहकार्याची जाणीव ठेवून, आणि भविष्यात त्यांना आरपीआयचे सहकार्य पाहिजे असेल तर, ग्रामपंचायत निवडणूकी मध्ये आर.पी.आय च्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना निवडून देण्यासाठी सहकार्य करावे.


0 Comments