अवैध सावकारी करणार्याविरोधात गुन्हे नोंदवा, ज्येष्ठ पत्रकार जोशी यांचा अन्नत्याग सत्याग्रह !
by Shabdhrekha express on December 04, 2020 inतालुका प्रतिनिधी
नांदेड- अवैध सावकारी व्यवसाय करणार्या विरोधात गुन्हा दाखल करावेत,या या मागणीसाठी ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांनी अन्न त्याग सत्याग्रह सुरु केला आहे.याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व सहकार विभागाकडे तक्रार नोंदविली आहे.जोशी यांनी दि.२ डिसंबर पासूनरोजी अन्नत्याग सत्याग्रह सुरु केला आहे.त्यांच्या सत्याग्रहाचा चौथा दिवस आहे. जोशी हे पत्रकार व्यवसायात चाळीस वर्षापासून काम करतात.त्यांच्या मुलाला व कुटुंबानी शहरात अवैध सावकारी व्यवसाय करणार्याकडून दहा ते पंधरा टक्क्यांनी कर्ज घेतले.त्या पैश्याच्या मोबदल्यात त्यांनी कुटुंबाकडून कोरे चेक व बाँडपेपर घेतले.
व्याजाची रक्कम थकत गेल्यानंतर या लोकांनी घरी गुंड पाठवून धमकी व त्रास देण्यास सुरूवात केली.या सावकारांनी व्याजापोटी चाळीस ते पन्नास लाखाला लुटले आहे. तरी त्यांचा व्याजाचा तगादा चालू आहे. पत्रकार जोशी यांना याची कल्पना नव्हती, त्यांना अवैध सावकारी व्यवसायात आपले कुटुंब फसल्याचे कळाले, तेंव्हा त्यांनी २२ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक मगर यांची भेट घेवून तक्रार दिली.मगर यांनी हे प्रकरण नांदेड विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल फिस्के यांच्याकडे सोपविले. प्रारंभी फिस्के या सावकरांना बेड्या घालू अशी भाषा वापरली.नंतर मात्र या प्रकरणात तडजोड करण्याचा प्रयत्न सुरु केला.त्यांनी अवैध सावकारी करणार्यांना एकत्रितपणे बोलविले!चर्चा केली.
त्यानंतर संनमताने त्यांचे एकसारखे जवाब नोंदवून घेतले.ते चौकशीसाठी मला व कुटुंबाला रोज सकाळी कार्यालयात बोलावयाचे तेथे दिवसभर बसवून ठेवायचे. सायंकाळी मग ''साहेब येणार नाहीत"!असे सांगून परत पाठवयाचे!असे बरेच दिवस चालले,यात दीड महिना गेला,अचानकपणे पत्रकाराच्या व्हाटसअॅपवर हा व्यवहार खासगीतला आहे!असा संदेश पाठविला.मी ही माहिती पोलीस प्रमुख मगर यांना दाखविली.त्यांनी हे प्रकरणे दुसर्या अधिकार्याकडे देण्याचे सांगितले! पण त्यांनी जिल्हा उपनिबंधकाशी बोलावून घेतले, त्यानंतर हे प्रकरण अवैध सावकारी कायद्याच्या भंग करणारे असल्याने त्यांच्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देश दिले.उपविभागीय अधिकार्यांनी सावकारकडील कोरे चेक व स्टँप हस्तगत करण्याचे सांगतिले,पण त्यांनी ते हस्तगत केलेच नाही,उलट त्या सावकारांना फूस लावली.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी १२ आॅगस्ट रोजी लेखी तक्रार,शपथपत्र घेतले गेले. यात त्यांची नावे,पत्ते, घेतले, व्याजाची रक्कम आदी सविस्तर माहिती दिली गेली, सहकार विभागाने प्राथमिक दृष्ट्या हा अवैध सावकारी व्यवसायाचा प्रकार असल्याचे सांगितले.त्यांच्यावर कारवाई करण्याचा विश्वासही दिला.
पण नंतर सहकार अधिकार्याने टाळटाळ सुरु केली, आता सण असल्याने पोलीसांची मदत मिळत नाही,मी रजेवर आहे,सद्या पीक विम्याचे काम लागले आहे,असे कारण सांगत गेले.नंतर बोभाटा झाल्यानंतर काही ठिकाणी झडतीचे देखावा केला,तर इतराची झडती घेतली गेलीनाही. उलट आमच्या विरोधात सावकाराशी संनमतकरून एकसारखे व एकतर्फी जवाब नोंदवून घेतले. हे प्रकरण दडपविण्याचा प्रयत्न करत आहेत नवीन कायद्यानुसार सहकार अधिकार्याला दिवाणी न्यायधिशाचे अधिकार आहेत.त्यांना झडती घेणे, कागदपत्रे हस्तगत करणे, चौकशी करणे! उलट तपासणी करणे! नोटीसा बजावून प्रकरण उजेडात आणणे त्यांचे कर्तव्य आहे. पण त्यांनी यात जाणीवपूर्वक दिरंगाई ,टाळटाळ केली आहे,अश्या प्रकरणात गुप्तता पाळली जाते,पण त्यांनीच सावकारांना सावध केले.त्या लोकांना वाचविण्याच्या उद्देशाने जबाब,देखावा केला. काही जणाकडे चेक सापडून कारवाई केली नाही.पोलीस व सहकार विभागाने अवैध सावकारी कायद्यान्वये कारवाई करण्यासटाळटाळ केली.
यापूर्वी जोशी यांनी अन्नत्याग सत्याग्रह केला होता. पण पोलीस अधीक्षक मगर, खा,चिखलीकर यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने त्यांनी सत्याग्रह मागे घेतला होता.त्यांनी "मरेन पण व्याज देणार नाही" अशी प्रतिज्ञा केली आहे. सहकार विभागाने आजपर्यंत कारवाई केली नसल्याने त्यांनी पुन्हा दि,२ डिसेंबर पासून करोनाच्या संकटामुळे घरीच "अन्न त्याग" सत्याग्रह सुरु केला आहे.आजही सावकारांकडून धमक्या व जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत! त्यामुळे त्यांनी घर व शेत विक्रीला काढले आहे.आज त्यांच्या सत्याग्रहाचा चौथा दिवस आहे.ते मधूमेह व र्हदय विकार आहे.त्यांची प्रकृती खालवत चालली आहे,यावरही न्याय मिळाला नाही तर सहकार कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पत्रकार जोशी यांनी दिला आहे.


0 Comments