google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अखेर राष्ट्रवादीचे माजी आमदार दिपकआबा साळुखे-पाटील यांच्या विरूध्द गुन्हा दाखल

Breaking News

अखेर राष्ट्रवादीचे माजी आमदार दिपकआबा साळुखे-पाटील यांच्या विरूध्द गुन्हा दाखल

 अखेर राष्ट्रवादीचे माजी आमदार दिपकआबा साळुखे-पाटील यांच्या विरूध्द गुन्हा दाखल


by टीम शब्दरेखा एक्सप्रेस

 December 5, 2020

Share post

टीम शब्दरेखा एक्सप्रेस।


नुकत्याच झालेल्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया सुरु असताना माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दिपकआबा साळुखे-पाटील यांनी विना परवाना मतदान केंद्रावर येवून शासकिय आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ डिसेंबर रोजी मंगळवेढा येथील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरु होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सदर दिवशी सकाळी 6 ते मतदान संपेपर्यंत जिल्हयातील सर्व मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे १४४ कलम लागू केले होते.

सदर दिवशी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दिपकआबा साळुखे-पाटील यांनी सदर मतदान केंद्रावर येवून पदवीधर मतदान केंद्र क्रमांक ३९४ व ३९६ मध्ये विना परवाना प्रवेश करून जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय आदेशाचा भंग केला.

त्यानंतर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सदर प्रकाराबाबत अर्जाव्दारे तक्रार केली.या अर्जाच्या चौकशीकामी जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे नोडल अधिकारी तथा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांची नियुक्ती केली.

त्यानंतर क्षेत्रीय अधिकारी एस.एल.मेटकरी यांनी पदवीधर मतदान केंद्र ३९४,३९५ , ३९६ चा ४ डिसेंबर रोजीचा व साई सर्व्हिसेस पुणे यांचेकडे वेब कास्टिंग रेकॉर्डींग हार्ड डिस्क याचे अवलोकन करून सदर गुन्हा दाखल करण्यासाठी जलसंपदा विभागाचे दत्तोबा मच्छिंद्र पडवळे यांना प्राधिकृत केले.

त्यावेळी पडवळे यांनी सदर प्रकाराची फिर्याद मंगळवेढा पोलिसात दिली.पोलिसांनी या प्रकरणी दिपकआबा साळुखे-पाटील यांचेविरूध्द मतदान केंद्रात विना परवाना , मतदान केंद्रातील गैर वाजवी प्रभाव पाडण्याच्या हेतूने मतदान केंद्रात प्रवेश करून जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय आदेशाचा भंग केल्या प्रकरणी कलम १७१ (फ), भा.दं.वि.सं.क लम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments