सांगोला नगरपरिषदेच्या स्विकृत नगरसेवक पदासाठी सांगोला शहर विकास महायुती सांगोला यांच्याकडून रेवनील ब्लड बँकेचे चेअरमन सोमेश रेवणसिध्द यावलकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे . स्विकृत पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे . आज ४ वाजता त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे . नगरसेवक सोमनाथ गुळमिरे यांनी काही दिवसापुर्वी आपला स्विकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे रिक्त झालेल्या स्विकृत पदावर श्री.सोमेश यावलकर यांनी काल सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालय नगरविकास शाखेत आपलानामनिर्देशीत सदस्याचा अर्ज दाखल केला . स्विकृत अर्ज सादर करते प्रसंगी नगराध्यक्षा राणीताई माने , गटनेते तथा नगरसेवक आनंदा माने , आरोग्य सभापती छायाताई मेटकरी , नगरसेविका सौ.अप्सराताई ठोकळे , नगरसेवक प्रशांत धनवजीर ,नगरसेवक अस्मिर तांबोळी , सुर्यकांत मेटकरी , काशिलिंग गावडे , शेखर गडहिरे , महादेव पारसे , अभिजित मदने उपस्थित होते . आज मंगळवार दि .२९ डिसेंबर रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात दुपारी ४ वाजता नगरपरिषदेची विशेष सभा आयोजीत करण्यात आली असून या सभेत सोमेश यावलकर यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे .


0 Comments