google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लोटेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी २७ डिसेंबर रोजी अंतिम बैठक

Breaking News

लोटेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी २७ डिसेंबर रोजी अंतिम बैठक

 लोटेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी २७ डिसेंबर रोजी अंतिम बैठक


सांगोला / प्रतिनिधी- लोटेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी आता पर्यंत तात्पुरत्या स्वरूपाच्या तीन बैठका पार पडल्या असून त्यातून काही नेते मंडळी  मतदार व  कार्यकर्ते यांचा कल हा लोटेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याच्या बाजूने आहे. तर काही अत्यल्प नेते यांचा कल हा निवडणूक झालीच पाहिजे या बाजूने आहे. त्यामुळे लोटेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता अंतिम बैठकीचे  नियोजन करण्यात आलेले आहे. सदर बैठकीसाठी गावातील नेते मंडळी, युवा कार्यकर्ते, मतदार यांनी उपस्थित राहून आपले मत नोंदवावे. लोटेवाडी  ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास शासनाचे २५ लाख रुपयेचे बक्षिस मिळणार आहे. तसेच सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार शहाजी(बापू) पाटील यांनी ३० लाख रुपयेचे बक्षिस जाहीर केलेले आहे. तसेच  शानाकडून वेगवेगळे फंडस मिळणार आहेत.

        लोटेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास गावातील शांतता अबाधित राहून गावाच्या विकासासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. अगोदरच उध्वस्त झालेल्या गावांना व  गावातील लोकांना आता निवडणुकीपेक्षा आपल्या लोकांच्या मदतीच्या हाताची खूप गरज आहे. ज्या गावात देश स्वातंत्र्य होऊन ७३ वर्षे झाली तरी अजून लाईट, रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत त्या गावांना निवडणुकीपेक्षा या गरजा पूर्ण व्हाव्यात हे महत्वाचे  वाटत आहे.  ज्या नेतेमंडळी आणि युवा कार्यकर्ते यांना खरंच गावाचे भले व्हावे असे वाटत असेल त्या सर्वानी या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित राहावे. व गावाला चांगली दिशा देण्यासाठी मार्गदर्शन करावे.  त्यामुळे सदर बैठकीस सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून गावाला प्रगतीची व विकासाची  दिशा देण्याचा प्रयत्न करावा. सदर बैठकीचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोटेवाडी नवी या ठिकाणी २७ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ५:०० वाजता  केलेले आहे.  

Post a Comment

0 Comments