सांगोला तालुक्याचे ज्येष्ठ नेते मा . आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत जुजारपूर गावातील शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला .
शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केलेले कार्यकर्ते पुढीलप्रमाणे जालिंदर पवार , उमेश पवार , संभाजी पवार , रवींद्र पवार , मारुती बाबर , सुभाष बाबर , बंडू पवार , जगन्नाथ लोखंडे , दत्तात्रय लोखंडे , सतीश लोखंडे , धुळा लोखंडे , प्रकाश लोखंडे , महिपती लोखंडे.तानाजी लोखंडे , सदाशिव लोखंडे , सोपान हाके , नामदेव लोखंडे , माधव लोखंडे ,भीमराव लोखंडे , यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे जुजारपूर मध्ये शेकापची ताकद वाढली आहे . १०० ते १५० कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख , माजी जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र कोळेकर , पंचायत समिती सदस्य नारायण पाटील , पंचायत समिती सदस्य सिताराम सरगर , भाई जगदिश कुलकर्णी , जुजारपूरचे भोला पाटील , बाळासाहेब पाटील , सुखदेव पवार , राजू पाटील , तुकाराम पाटील , अंतू पाटील , रुपेश गाडे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा जुनोनी येथे संपन्न झाला . कार्यकत्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करत शेतकरी कामगार पक्षाचा व भाई गणपतराव देशमुख यांचा विजय असो , अशा घोषणा देण्यात आल्या .जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख बोलताना म्हणाले , शेतकरी कामगार पक्षाचे आबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत . शेतकरी कामगार पक्ष हा तालुक्यातील सर्वात मोठा पक्ष आहे.आपापसातले मतभेद मिटवून कोळा जिल्हा परिषद गटातील होणाऱ्या सर्वच ग्रामपंचायतीवर मी स्वतः लक्ष केंद्रित केले आहे . प्रवेश केलेल्यांचे अभिनंदन करतो असे सांगितले . यावेळी गजेंद्र कोळेकर म्हणाले , कोळा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ कोळेकर यांच्या निधनानंतर च्या झालेल्या पोटनिवडणुकीत मी शेकाप च्या | वतीने जिल्हा परिषदेला सदस्य उभा असताना त्यावेळी शेकापच्याकार्यकर्त्यांचा उत्साह जो होता तो आज यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला . प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो भावी वाटचालीस शुभेच्छा देतो . यावेळी पंचायत समिती सदस्य नारायण पाटील म्हणाले की , पुढील महिन्यात होणान्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला गावातील गट विसरून सर्वांनी एकोप्याने सामोरे जाऊ या . शेकापक्ष सर्वसामान्यांच्या विचारावर चालणारा पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले . या पक्ष प्रवेश सोहळ्यास राजू पाटील , गजानन हिप्परकर , पिंटू माने , वसंत माने , दादा व्हरघर , काका लोखडे , पांडुरंग वाघमोडे , बाबासो हिप्परकर , अर्जुन बजबळकर , आप्पा ज्ञानू हाके , संतोष हिप्परकर , शंकर लोखडे , रवी पाटील , बाळू मान , गोरख बजबळे , विजय बजबळे , संतोष बजबळे , मधुकर गाडे , चंद्रकांत बजबळे , तुकाराम पाटील , विष्णू माने , संतोष पवार , विश्वास चौगुले , नारायण चौगुले , महादेव लोखंडे , तानाजी पवार , बाळू पवार , काका पवार , पवन गाडे , आप्पा माने , धनाजी माने , त्यासह जुजारपूर परिसरातील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आबासाहेबांवर प्रेम करणारे नेतेमंडळी आदी उपस्थित होते .


0 Comments