google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोमवारी सांगोल्यातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संवाद ; जिल्हा अध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख

Breaking News

सोमवारी सांगोल्यातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संवाद ; जिल्हा अध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख

 

सोमवारी सांगोल्यातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संवाद ; जिल्हा अध्यक्ष  श्रीकांतदादा देशमुख

शेतक-यांच्या शेतीमालाला देशाची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या किसान रेल्वेच्या शंभराव्या फेरिनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाइन किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून सांगोला तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील शेतकऱ्यांशी सोमवार २८ डिसेंबर २०२० रोजी संवाद साधणार आहेत अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी दिली आहे . 

शंभर फे-या पूर्ण करणारी किसान रेल्वे ही सांगोल्यातून जाणारी देशातील पहिली किसान रेल्वे आहे . किसान रेल्वे सुरू करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे .सांगोला तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी डाळिंब सातासमुद्रापार पोहोचवले असून दुष्काळी भागाचा नावलौकिक वाढवला आहे . 

सांगोला तालुक्यात पहिली किसान रेल्वे २१ सप्टेंबर २०२० रोजी सुरू करण्यात आली होती . त्यानंतर शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने सांगोल्यातून चार किसान रेल्वे सुरू झाल्या आहेत . सांगोला येथून किसान रेल्वे सुरू करण्यासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी वारंवार पाठपुरावा केला होता . किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांसह रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे . 

शेतकऱ्यांना कमी खर्चात शेतीमाल विक्रीसाठी देशातील वेगवेगळ्या बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना या किसान रेल्वेचा मोठा फायदा झाला आहे . सांगोला रेल्वे स्थानकातून सुरू झालेल्या किसान रेल्वेची सोमवारी शंभरवी फेरी पूर्ण होणार आहे . या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार २८ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ४ वाजता शंभराव्या फेरीच्या किसान रेल्वेला ऑनलाइन हिरवा झेंडा दाखवणार आहेत . 

तसेच किसान रेल्वे संदर्भात सांगोला तालुक्यासह पंढरपूर , माढा , करमाळा , माळशिरस या तालुक्यातील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी दिली , केंदीय रेल्वेमंत्री पियुष गोयल व रेल्वे बोर्डाचे विभागीय चेअरमन खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर , रेल्वेचे जीएम संजीव मित्तल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . 

सदर संवादासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार , आमदार , रेल्वेचे डीआरएम , अधिकारी उपस्थित राहणार आहेत . या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments