*पत्रकार विषयी काही बोलण्या आधी काय असतो पत्रकार हे नक्कीच समजून घ्या*
✍️✍️✍️✍️✍️
पञकारीता कशी असावी ........
समाजातील राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील लोकांनो
श्रमजीवी, ग्रामीण पत्रकारिता,मुक्त पत्रकारीता, म्हणजे प्रिंट मिडीयाची पत्रकारीता व डिजीटल पत्रकारीता ,काय असते हे तुम्हाला ज्ञात आहे का ?
कोण असतो पत्रकार ?
कशी असते पत्रकारिता ?
थोडे कान इकडे करा ऐका,
घरची भाकरी खाऊन जगाचा आरसा असतो पत्रकार ??
घरदारावर तुळशीपत्र ठेवून, घरचे पैसे खर्चून, गावातील, परिसरातील प्रश्न त्याला तडीस नेण्यासाठी धडपडतो तो पत्रकार ?
अहो तुम्हाला वाटेल पगार असेल अहो कसला पगार आम्हाला साधे मानधन ही नसते, असले तर अगदी थोडके, बातमीच्या शोध, लेखन, वेळ, व बातमी पाठविणे, ती छापून येईपर्यंत वाट बघणे, अन दुसर्या बातमीच्या शोधला लागणे ही पत्रकारिता असते, हे समजून घ्या,
कुठलाही आर्थिक आधार नसतांना बातमीला आपला श्वास समजतो तो पत्रकार,
बातमी छापुन आल्यावर तिचे परिणाम भोगतो तो पत्रकार ?
लोकांच्या दूषणे, पुढार्यांच्या नको त्या प्रश्नाला भिडतो तो पत्रकार,
हे सर्व समाजासाठी भोगतो पत्रकार.
हो हे लिहितो ना मी आहे तसाच, जो बातमीसाठी आयुष्य भर राबतोय,
समाजाला किती कळतो पत्रकार ?????
लोकशाही चा हा चौथा स्तंभ !!..
अरे विचार करा गाव असो की तालुका असो पत्रकारांचा सन्मान आदर केला जात असेल, किंवा नसेल ही! पण किती जण पत्रकारांना विचारतात!
त्यांचे तुमच्या राजकारणाशी काही घेणे देने नाही,
पत्रकार समाजाचा प्रतिनिधी असतो,
पुढारी अधीकारी लोकांचा तो नौकर गुलाम नाही हे लक्ष्यात घ्या,
पत्रकाराने बातमी कशी लिहावी हे त्याला शिकवू नका यासाठी तो सक्षम आहे,
दमदाटी व अरेरावी हल्ले अनादर, अपमान हे पत्रकारांचा करू नका,
तो तुम्हाला अधिकार नाही,
पत्रकारिता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, हे जाणून घ्या,
गुर्मी अहंकार दादागिरी हल्ले करून तुम्हाला काही साध्य होणार नाही, पोलीस तक्रार केली असे हल्ले हे दखलपात्र गुन्हे आहेत, पत्रकार संरक्षण कायदा आहे हे लक्ष्यात घ्या,
जर अन्याय होत असेल तर पत्रकार संरक्षण समिती, अखिल भारतीय समन्वय समिती आहेच..
आम्ही हल्लेखोरांना बघून घेऊ,
आम्ही तुमचे विषय पत्रकारितेच्या माध्यमातून मांडीत असू तर आमच्या संरक्षणाची जबाबदारी समाजाची नाही का ?
आम्हाला वाऱ्यावर सोडू नका,
कारण हे आमचे व्रत आहे,
आम्ही बातमीला तत्व समजतो,
तत्वाशी तडजोड आम्ही करीत नाही,
आम्ही बातमीच्या जगात विकले जात नाहीत, आमच्या जगन्यात आमचे कष्ट आहे...
संपादक....👏
✍️✍️✍️
0 Comments