सांगोला ( सोलापूर ) : राज्य शासनाच्या निर्णयानुसार सांगोला तालुक्यातील 76 शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सोमवारी ( ता . 23 ) सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग , तालुका आरोग्य विभागाचे कर्मचारी व मुख्याध्यापक यांनी कंबर कसली आहे . या पार्श्वभूमीवर तालुक्यातील 76 शाळांमधील 687 शिक्षकांसह एकूण 1169 कर्मचाऱ्यांची अँटिजेन रॅपिड टेस्ट घेण्याचे काम सुरू करण्यात आल माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रकाश यादव यांनी मात्र शाळा सुरू झाल्या तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतील का हि शंका मागील आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सोमवार ( ता . 23 ) पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे
. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळांना शाळा सुरू करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत . तालुक्यातील 76 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील इंग्रजी , गणित व विज्ञान हे विषय शिक्षकविणाऱ्या शिक्षकांची प्रथम अँटिजेन रॅपिड टेस्ट घेण्याचे काम आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आले आहे . 76 शाळांमधील नववी ते बारावीला शिकविणारे सुमारे 687 शिक्षक , 250 शिपाई , 21 ग्रंथपाल , 27 प्रयोगशाळा सहाय्यक , 44 प्रयोगशाळा परिचर व इतर 140 असे मिळून 1169 कर्मचाऱ्यांची कोरानाची तपासणी करण्यात येणार आहे . अँटिजेन रॅपिड टेस्टमध्ये निगेटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर ( घशातील स्वब ) टेस्ट करणे बंधनकारक आहे . शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक - पालक यांची स्वतंत्र बैठक , पालकांचे संमतिपत्र , शालेय परिसर सॅनिटाई मास्क , हँडवॉश आदी भौतिक सुविधा उपलब्ध फिजिकल डिस्टन्स पाळणे बंधनकारक असल्याने मुख्याध्यापकांची दमछाक होताना दिसत आहे . शाळेत विद्यार्थी पाठविण्यास बहुतांश पालकांचा नकार इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत . शाळेत विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी पालकांचे संमतिपत्र आवश्यक आहे . कोरोनावर अध्यापही लस नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे . याबाबत बहुतांश पालकांनी " आम्ही मुलांना शाळेत लवकर पाठवणार नाही ' असे " सकाळ'शी बोलताना सांगितले . संपादन : संतोष साठे
0 Comments