google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आनंददायी बातमी गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेला जनावरांचा बाजार पुन्हा होणार सुरु

Breaking News

आनंददायी बातमी गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेला जनावरांचा बाजार पुन्हा होणार सुरु

 



अन्यायाविरुद्ध लढणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ

आनंददायी बातमी गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेला जनावरांचा बाजार पुन्हा होणार सुरु

सांगोला / प्रतिनिधी :   सांगोला तालुक्यातील जनावरांचा आठवडे बाजार महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून कोरोना या माहामारी मुळे  गेल्या सात महिन्यापासून जनावराचा बाजार बंद आहे.परंतु एक महत्वाची माहिती समोर येत आहे की सांगोला  येथील जनावरे व शेळी-मेंढी बाजार रविवार दि.25 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गिरीश गंगथडे   दिली आहे.


     दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि दक्षता-खबरदारी घेण्यासाठी   शुक्रवार दि.20 मार्च 2020 पासून हा जनावरांचा बाजार बंद करण्यात आला होता.


      दरम्यान हा बाजार येत्या दोन दिवसात सुरु करण्यात येणार आहे. याबाबत सांगोला कृषि उत्पन्न बाजार समितीचे वतीने प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सांगोला येथील बाजरात राज्यातील व परराज्यातील शेतकरी, व्यापारी जनावरे व शेळी-मेंढी खरेदी-विक्री करण्यासाठी येतात.त्यामुळे बाजार आवारात मोठया प्रमाणात गर्दी होते. कोविंड-19 या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जनावरांचा बाजार भरवताना मानक कार्यपद्धती व  नियमांचे पालन शेतकरी व व्यापारी वर्गानी  करावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गिरीष  गंंगथडे यांनी केले आहे शेतकरी व व्यापाऱ्यांनी  जनावरे बाजारामध्ये आत येण्यासाठी एक गेट व बाहेर जाण्यासाठी वेगवेगळ्या गेट ची व्यवस्था केलेली आहे बाजारामध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांनी गर्दी होणार नाही सोशल डिस्टंसिंग चे पालन होईल याची दक्षता घ्यावी गेटवर सॅनिटायझर थर्मल    स्कॅनर मशीन पल्स ऑक्सीमिटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे शेतकरी व व्यापाऱ्यांनी स्वतः मास्कचा वापर करावा लहान मुले व वृद्ध व्यक्ती गर्भवती महिला व गंभीर आजार असलेल्या व्यक्ती यांना अत्यावश्यक व आरोग्याचे कारण वगळता सदर ठिकाणी येण्यास मनाई राहील बाजारामध्ये येणाऱ्या शेतकरी व व्यापारी वर्गांनी एकमेकांमध्ये किमान सहा फूट अंतर ठेवणे गरजेचे आहे तसेच सदर ठिकाणी पाचपेक्षा जास्त अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन व्यापार करण्यास मनाई राहील बाजारामध्ये  आलेल्या शेतकरी व्यापारी व ग्राहकांस सदर ठिकाणी थुंकण्यास बंदी असेल चुकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल बाजार  आवारामध्ये धुम्रपान करण्यास मनाई राहील वरील सर्व नियम व अटीचे शेतकरी व व्यापारी सर्व घटकांनी पालन करून  कृषी उत्पन्न बाजार समितीस सहकार्य करावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  गिरीश गंगथडे यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments