google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मारहाणीच्या धक्क्याने युवकाची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्या ; सांगोला तालुक्यातील आलेगाव येथील घटना

Breaking News

मारहाणीच्या धक्क्याने युवकाची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्या ; सांगोला तालुक्यातील आलेगाव येथील घटना


 

मारहाणीच्या धक्क्याने युवकाची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्या ; सांगोला तालुक्यातील आलेगाव येथील घटना !


किरकोळ भांडणातून आलेगांव ता.सांगोला येथील पोपट बाबर व गोविंद पोपट बाबर या पिता पुत्राला ५ जणांनी शिवीगाळ करत लाथाबुक्याने मारहाण केली होती . या घटनेचा मानसिक धक्का बसल्याने आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तींच्या त्रासास कंटाळून गोविंद पोपट बाबर वय २३ या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० च्या सुमारास घडली आहे . 

रविवार १८ ऑक्टोबर रोजी ४ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पोपट बाबर यांचा मयत मुलगा गोविंद बाबर रा.आलेगाव ता . सांगोला हा दुचाकीवरून आपल्या घरी जात होता . फॉरेस्ट परिसरात आल्यावर सिताराम ऊर्फ पिंटू लवटे , त्याची पत्नी मनीषा लवटे , सानिया लवटे व साहिल लवटे सर्व रा.मेडशिंगी यांनी गोविंद बाबर यास थांबवून त्याचा साहिल बरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मनीषा लवटे व सिताराम ऊर्फ पिंटू लवटे यांनी गोविंद यास माझ्या मुलाच्या नादी लागू नको नाहीतर तुला सोडणार नाही म्हणून शिवीगाळ व मारहाण केली.

यावेळी गोविंद बाबर याने तुमचा मुलगा उलट माझ्यासोबत अरेरावीची भाषा करतो असे म्हणून तो घरी निघून आला . त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ६ च्या सुमारास सिताराम ऊर्फ पिंटू लवटे , मनीषा लवटे व त्यांचे वडील हनुमंत दादा लवटे यांनी बाबर यांच्या घरात घुसून पोपट बाबर व त्यांचा मुलगा गोविंद बाबर यांना शिवीगाळ केली . सिताराम उर्फ पिंटू लवटे , हणमंत लवटे , मनीषा लवटे यांनी गोविंद यास हाताने , लाथाबुक्क्यांनी मारहाण केली .

फिर्यादी पोपट बाबर हे त्यांना मारहाण करू नका माझ्या मुलास का मारता असे म्हणालो असता त्यांनाही मारहाण व शिवीगाळ करून तुम्हाला पाहून घेतो अशी दमदाटी केली . एकंदरीत या सर्व घटनेमुळे फिर्यादीचा मुलगा गोविंद यास मानसिक धक्का बसला होता . त्या त्रासाला कंटाळून गोविंद बाबर याने सोमवार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० च्या सुमारास लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .

 याबाबत पोपट रामचंद्र बाबर यानी सीताराम उर्फ पिंटू लवटे , मनीषा लवटे , हणमंत लवटे , सानिया लवटे व साहिल लवटे यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . अधिक तपास सपोनि शांत हुले करीत आहेत .

Post a Comment

0 Comments