google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0
कारंडे वाडी तील घटना जमीन वादातून एका महिलेवर कुणी हल्ला
कारंडे वाडी तील घटना जमीन वादातून एका महिलेवर कुणी हल्ला
जमीन खरेदी केल्याचा राग मनात धरून एक जणाने तुला आता जिवंत सोडतच नाही , खलासच करतो अशी धमकी देत महिलेच्या गालावर , कानावर , हातावर , हाताच्या बोटांवर व शरीरावर जिवे ठार मारण्याच्या उद्देषाने कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिलेच्या डाव्या हातांची २ बोटे तुटली असून ३ बोटे अर्धवट तुटली आहे . गंभीर जखमी झालेल्या या महिलेवर सध्या सोलापूर येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत .
या प्रकरणी रावसाहेब गोरख करांडे , वय ३५ वर्ष , रा.लक्ष्मीनगर , करांडेवाडी , ता.सांगोला याच्याविरूध्द सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादी विष्णु मच्छिंद्र करांडे रा . लक्ष्मीनगर , करांडेवाडी ता.सांगोला यांचे चुलते शंकर कृष्णा करांडे यांनी गावातील महादेव मारूती करांडे यांची २० गुंठे शेत जमीन खरेदी केली होती . शंकर करांडे यांनी महादेव करांडे यांनी जमीन विकत घेतल्यापासून महादेव करांडे यांच्या भावाचा मुलगा रावसाहेब गोरख करांडे यास राग होता . रावसाहेब यास राग असल्याने तो शंकर करांडे व नंदाबाई करांडे यांच्या सोबत मागील काही दिवसांपासून जमीनीच्या वादावरून शाब्दीक भांडण काढत होता .
२१ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या नंदाबाई करांडे ही घरात स्वयंपाक करत असताना रावसाहेब करांडे हा मोठमोठयाने शिवीगाळ करत नंदाबाई व शंकर यांना घरातून बाहेर काढा , यांना या ठिकाणी राहू द्यायचे नाही असे रागाने बोलू लागला . सदरचे भांडण चालू असताना सरस्वती गोरख करांडे ,गोरख कृष्णा करांडे , जयाबाई करांडे हे त्या ठिकाणी आले . रावसाहेब हा रागारागाने घरात जाऊन शिवीगाळ करत नंदाबाई करांडे यांच्यावर कोयत्याने डाव्या गालावर व कानावर जोरात वार केला . पुन्हा रावसाहेब करांडे याने नंदाबाई यांच्या डाव्या हातावर व बोटांवर वार केल्याने या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताची २ बोटे तुटली असून ३ बोटे अर्धवट तुटली आहेत .
त्यांनतरही रावसाहेब याने नंदाबाई करांडे यांच्या शरीरावर व हातावर कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याच्या उदेशाने गंभीर जखमी केले . सदरचे भांडण सोडविण्यासाठी विष्णु करांडे हे गेले असता रावसाहेब याने अंगावर कोयता उगारून फिरवला मात्र त्यांनी वार चुकवल्याने ते बचावले . त्यानंतर रावसाहेब हा कोयता घेऊन धमकी देत निघून गेला . कोयत्याने वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या नंदाबाई यांना अँम्बुलन्स मधून आणून कोळा , सांगोला या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात आले . मात्र गंभीर जखमी झाल्याने नंदाबाई यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे . या प्रकरणी विष्णु मच्छिंद्र करांडे यांनी रावसाहेब गोरख करांडे याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
0 Comments