एकाच कुटुंबातील ४ अल्पवयीन मुलांची कुर्हाडीने वार करुन हत्या !
जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा ता. रावेर या गावामध्ये एका रखवालदाराच्या कुटुंबातील ४ मुलांची कु-हाडीने वार करून खुन करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.या मुलांची हत्या झाली तेव्हा या मुलांचे आई वडील घरात नव्हते. सईता मेहताब भिलाला वय १२ ,रावल वय ११,अनिल वय ८, सुमन वय ३ या चौघांचा कु-हाडीचे घाव घालून निर्घृणपणे खुन करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.
Tags # तालुका प्रतिनिधी
0 Comments