google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 Shabdhrekha Express www.shabdhrekhaexpress.in

Breaking News

 मुसळधार पावसाचे पाणी घरात घुसल्याने नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाने सरसकट ५० हजार व जीवितहानी झालेल्यांना १० लाख रुपये अनुदान द्यावे.वैभव गिते बारामती ( प्रतिनिधी ) : - राज्यात अतिवृष्टीमुळे नदी काठावरील गावांमध्ये घिरांमध्ये पावसाचे , नदीचे , ओढ्याचे पाणी घरात व घराच्या भोवती शिरल्याने अनेक कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे.पावसाची तीव्रता एवढी आहे की शेती आहे का नदी हे ओळखणेसुद्धा कठीण झाले आहे.काही पाळीव जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत.तर काहींच्या घरात पाणी घुसल्याने संसारउपयोगी साहित्य , कागदपत्रे नष्ट झाली आहेत.काही ठिकाणी घरे उध्वस्त झाली.काही ठिकाणी अर्धवट पडलेली आहेत.मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यात पोहत आहेत.तर काहींच्या शेतातील मातीसुद्धा वाहून गेल्याचे दिसत आहे.नेहमीप्रमाणे शासनाचा गलथान कारभार दिसून आला.आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या गावांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना दिली नाही.सतर्कतेचा इशारा दिला नाही.तेथील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले नाही.त्यामुळे ज्याठिकाणी शासनाच्या हलगर्जीपणामुळे जीवितहानी झाली असेल त्या ठिकाणच्या मंडलअधिकारी , तलाठी व कोतवाल यांना जबाबदार धरून निलंबित करावे.सरसकट पंचनामे करून सर्व कुटुंबांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे.व जीवित हानी झाली असल्यास प्रत्येक कुटुंबास १० लाख रुपये द्यावेत.अन्यथा आम्ही नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस ( एन.डी.एम.जे ) या संघटनेच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालय येथे दिनांक २०/१०/२०२० रोजी तीव्र आंदोलन करणार आहोत याची नोंद घ्यावी असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे.अशी माहिती नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे .

Post a Comment

0 Comments