google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार ९ ८१ शेतकऱ्यांच्या २६ हजार ७६६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान

Breaking News

अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार ९ ८१ शेतकऱ्यांच्या २६ हजार ७६६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान

 

शासनास अतिवृष्टी,पुरस्थितीचा अहवाल सादर - तालुका कृषीअधिकारी दिपाली जाधव यांची माहिती !

अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार ९ ८१ शेतकऱ्यांच्या २६ हजार ७६६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान

सांगोला (विषेश प्रतिनिधी ) : - गेल्या पंधरा दिवसापुर्वी सांगोला तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन ३३ हजार ९ ८१ शेतकऱ्यांच्या २६ हजार ७६६.३२ क्षेत्राचे मोठे नुकसान झाले ४० कोटी ८१ लाख ७४ हजार ८४७ रुपये एवढ्या अपेक्षित निधीचा गरज असून अतिवृष्टी व पुर स्थितीचा अहवाल शासनास सादर केला असल्याची माहिती कृषीअधिकारी दिपाली जाधव यांनी दिली . सांगोला तालुक्यात फळपिके सोडून जिरायत पिकाखालील ५ हजार ३८५ शेतकऱ्यांचे ४ हजार ३८६.७७ हेक्टरचे नुकसान झाले असुन २ कोटी ९ ८ लाख ३० हजार ०३६ रुपये अपेक्षित निधीची गरज आहे . ४ हजार शेतकऱ्यांच्या ३४०८.७७ हेक्टर ज्वारीचे नुकसान झाले आहे . १ हजार २२८ शेतकऱ्यांच्या ९ ०१.१० हेक्टर बाजरीचे नुकसान झाले आहे . ८ शेतकऱ्यांच्या ४ हेक्टर कडवळ या पिकाचे नुकसान झाले आहे . ४४ शेतकऱ्यांच्या २५.८० हेक्टर क्षेत्रावरील सुर्यफुलाचे नुकसान झालेआहे . ७ शेतकऱ्यांच्या २.६० हेक्टर उडीदचे नुकसान झाले आहे . ६ शेतकऱ्यांच्या २ हेक्टर मुग या पिकाचे नुकसान झाले आहे . ६ शेतकऱ्यांच्या ४.८० हेक्टरवरील भुईमुग पिकाचे नुकसान झाले आहे .८७ शेतकऱ्यांच्या ३७.७० हेक्टर क्षेत्रावरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे . ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळपिके सोडून बागायत पिकाखालील ८ हजार १ ९ ६ शेतकऱ्यांचे ५ हजार ४४५.५८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून ७ कोटी ३५ लाख १५ हजार ३३० रुपये अपेक्षित निधीची गरज आहे . १०७६ शेतकऱ्यांच्या ७६५.९ ० हेक्टर क्षेत्रावरील ऊसाचे नुकसान झाले आहे . ५२८३ शेतकऱ्यांच्या ३५ ९ ८.०८ हेक्टर क्षेत्रावरील मकाचे नुकसान झाले आहे . १३५८ शेतकऱ्यांच्या ७८२.३८ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे . २ ९ ५ शेतकऱ्यांच्या १६४.८२ हेक्टर क्षेत्रावरील कांद्याचे नुकसान झाले आहे .८ ९ शेतकऱ्यांच्या ४३.८० हेक्टर क्षेत्रावरील भुईमुगाचे नुकसान झाले आहे . ९ १ शेतकऱ्यांच्या ८८.६०हेक्टर क्षेत्रावरील शेवग्याचे नुकसान झाले आहे . ४ शेतकऱ्यांच्या २ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे नुकसान झाले आहे . ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळ पिकाखालील २० हजार ३ ९९ शेतकऱ्यांच्या १६ हजार ९३३.९ ७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असुन ३० कोटी ४८ लाख २ ९ हजार ४८१ रुपये एवढ्या अपेक्षित निधीची गरज आहे . १ ९ हजार ५३ शेतकऱ्यांच्या १५ हजार ९ २ ९ .७६ हेक्टर क्षेत्रावरील डाळींबाचे नुकसान झाले आहे . २२२ शेतकऱ्यांच्या १ ९ ७.५५ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष नुकसान झाले आहे . ६० शेतकऱ्यांच्या ३७ हेक्टर क्षेत्रावरील आब्याचे नुकसान झाले आहे .२२३ शेतकऱ्यांच्या १४१.५६ हेक्टर क्षेत्रावरील चिकुचे नुकसान झाले आहे . ७ शेतकऱ्यांच्या १.९ ० हेक्टर क्षेत्रावरील मोसंबीचे नुकसान झाले आहे . १८१ शेतकऱ्यांच्या १३२.८५ हेक्टर क्षेत्रावरील पेरुचे नुकसान झाले आहे . २२ ९ शेतकऱ्यांच्या १६६ हेक्टर क्षेत्रावरील बोराचे नुकसान झाले आहे . ८७ शेतकऱ्यांच्या७५.८० हेक्टर क्षेत्रावरील सिताफळाचे नुकसान झाले आहे . ८५ शेतकऱ्यांच्या ७७.७० हेक्टर क्षेत्रावरील पपईचे नुकसान झाले आहे . ४ शेतकऱ्यांच्या २.३० हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाले आहे . २२ शेतकऱ्यांच्या १५.३० हेक्टर क्षेत्रावरील आवळ्याचे नुकसान झाले आहे . २२६ शेतकऱ्यांच्या १५६.२५ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे . फळपिके सोडून जिरायत पिकाखालील ५ हजार ३८६ शेतकऱ्यांच्या ४ हजार ३८६.७७ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले असुन २ कोटी ९ ८ लाख ३० हजार ३६ रुपये अपेक्षित निधीची गरज आहे . फळपिके सोडून बागायती पिकाखालील ८ हजार १ ९ ६ शेतकऱ्यांच्या ५ हजार ४४५.५८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असुन ७ कोटी ३५ लाख १५ हजार ३३० रुपये अपेक्षित निधीची गरज आहे . फळपिकाखालील २० हजार ३ ९९ शेतकऱ्यांच्या १६ हजार ९३३.९ ७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असुन ३० कोटी ४८ लाख २ ९ हजार ४८१ रुपये अपेक्षित निधीची गरज आहे .



Post a Comment

0 Comments