बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा तातडीने शोध लावावा ; सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब ठोकळे व होलार समाजाच्यावतीने सांगोला पोलीसांना निवेदन सादर !
साप्ताहिक शब्दरेखा एक्सप्रेस

जवळा ता.सांगोला येथून बेपत्ता झालेल्या मुलीचा तातडीने शोध करावा अश्या मागणीचे निवेदन बहुजन नेते
, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे व तालुक्यातील होलार समाज्याच्या वतीने सांगोला पोलीसांना देण्यात आले आहे . सध्या देशासह महाराष्ट्रात दलित समाजावरती अन्याय-अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे .त्यामुळे दलित समाज भयभीत अवस्थेत जगत आहे .
जवळा ता.सांगोला येथील अल्पवयीन बेपत्ता मुलीचा जलदगतीने शोध घेऊन भविष्यातील अनर्थ टाळावा अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक बापूसाहेब ठोकळे यांनी निवेदनाव्दारे सांगोला पोलीसांकडे केली आहे .दिनांक २५ ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजता जवळा येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे.सदर घटनेबाबत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस स्टेशनकडून तपास कामी विलंब होत असल्या कारणाने सांगोला तालुक्यातील समस्त होलार समाजाच्या वतीने शुक्रवार दि .३० रोजी सांगोला पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज सोनवलकर यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक बापूसाहेब ठोकळे , जेष्ठ समाजसेवक बाळासाहेब बनसोडे , इंजि.मधुकर भंडगे अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष दिपकराव ऐवळे , दत्तात्रय वाघमारे , दत्ता ऐवळे , तानाजी वाघमारे , पोपट वाघमारे , दिपक वाघमारे , पिंटु वाघमारे , विशाल वाघमारे यांच्यासह समाजबांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते


0 Comments