Breaking News

महूद रोड रेल्वे गेट ३१ तीन दिवस बंद; वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

महूद रोड रेल्वे गेट ३१ तीन दिवस बंद; वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा


सांगोला : मध्य रेल्वेच्या पंढरपूर–सांगोला रेल्वे मार्गावरील महूद रोड येथील रेल्वे गेट क्रमांक ३१ दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी तब्बल तीन दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

 त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

महूद रोडवरील किलोमीटर ४५७/२-३ येथे असलेल्या या रेल्वे गेटवर रेल्वेच्या आवश्यक दुरुस्ती व देखभालीचे काम करण्यात येणार आहे.

 त्यासाठी सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजेपर्यंत गेट पूर्णपणे बंद राहणार आहे.

या कालावधीत रेल्वे गेटमधून कोणत्याही प्रकारची वाहतूक करता येणार नसल्याने

 महूद, सांगोला शहर तसेच परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

मध्य रेल्वे, पंढरपूर येथील वरिष्ठ विभागीय अभियंता (रेल पथ) यांनी दि. ३ ऑक्टोबर रोजी याबाबत सूचना जारी केली आहे. रेल्वे प्रशासनाने या बंदची 

माहिती एस.टी. डेपो व्यवस्थापक सांगोला व पंढरपूर, रेल्वे सुरक्षा बल पंढरपूर, सार्वजनिक बांधकाम विभाग 

सांगोला, तहसीलदार सांगोला, वाहतूक शाखा व शहर पोलीस ठाणे सांगोला तसेच नगरपरिषद सांगोला यांना दिली आहे.

दुरुस्तीचे काम सुरू असताना वाहतुकीची गैरसोय होऊ नये यासाठी नागरिकांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे 

आणि ५ ते ७ ऑक्टोबरदरम्यान महूद रोड रेल्वे गेटचा वापर टाळून पर्यायी मार्गाने प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments