पत्रकार बबन चव्हाण मारहाण प्रकरणात चौघांना अटक सांगोला पोलिसांची कारवाई; पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग
सांगोला प्रतिनिधी पत्रकार बबन चव्हाण यांच्यावर झालेल्या मारहाण प्रकरणात सांगोला पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवत चार आरोपींना अटक केली आहे.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गु.र. नं. ८४६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेत आरोपींचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान आरोपी निष्पन्न झाल्यानंतर बालाजी बबन चव्हाण (रा. वाकी), महेंद्र दत्तात्रय बोडरे (रा. एकतपूर),
अजय भीमराव चव्हाण (रा. एकतपूर) आणि आबा शिवाजी चव्हाण (रा. एकतपूर) या चौघांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी उपलब्ध माहिती व तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली.
चौघांच्या अटकेनंतर या प्रकरणाच्या पुढील तपासाला वेग आला असून, मारहाणीच्या घटनेमागील नेमकी कारणे व इतर बाबींचा तपास केला जात आहे.
ही कारवाई सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतपाल कांबळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, पोलीस हेड कॉन्स्टेबल क्र. २३८ नवनाथ सावंत आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश काळे यांनी केला.
दरम्यान, पत्रकार बबन चव्हाण मारहाण प्रकरणात चार आरोपींना अटक झाल्याने या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


0 Comments