सांगोला अनकढाळ टोल नाक्याजवळ टमटम-बुलेटची धडक
सांगोलाः सांगोला-आटपाडी रस्त्यावरील अनकढाळ टोल नाक्याजवळ टेम्पो
व बुलेट मोटारसायकल च्या झालेल्या भीषण अपघातात वाटंबरे येथील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
अजित पवार (वय ३०, रा. वाटंबरे, ता. सांगोला) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालक याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.५० वाजता अनकढाळ टोलनाक्याजवळ हा अपघात झाला.
याबाबत मृत अजित पवार यांचे भाऊ अमोल पवार (रा. वाटंबरे) यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
अमोल पवार हे सीया रिसॉर्ट येथे असताना त्यांना अजितचा
अपघात झाल्याची फोनद्वारे माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता अजितच्या हात-पायांना फॅक्चर झाले होते तसेच डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध अवस्थेत होता.
घटनास्थळी अजितच्या नावावरील बुलेट मोटारसायकल तसेच टमटम रस्त्याच्या कडेला उभे
वाटंबरे येथील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू
असल्याचे दिसून आले. या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाला. तसेच दोन्ही वाहनांचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.
जखमी अजित यांना तातडीने हायवे अॅम्ब्युलन्सने स्पंदन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी
त्यांना मिरज किंवा सांगली येथे नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार अॅम्ब्युलन्सने त्यांना सांगलीकडे नेत असताना वाटेतच त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.
त्यानंतर त्यांना सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.


0 Comments