Breaking News

सांगोला तालुक्यातील मांजरी येथे अपघात; ५९ वर्षीय इसमाचा मृत्यू

सांगोला तालुक्यातील मांजरी येथे अपघात; ५९ वर्षीय इसमाचा मृत्यू

सांगोला : सांगोला तालुक्यातील मांजरी येथे झालेल्या अपघातात एका ५९ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 


याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.

अपघातामध्ये बलभिम कांबळे, वय ५९ वर्षे, रा. मांजरी, ता. सांगोला, जि. सोलापूर यांचा मृत्यू झाला आहे.

सांगोला पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.११/०९/२०२६ रोजी सकाळी

१०.२५ वा. मांजरी (ता. सांगोला) येथे त्यांचा अपघात झाला होता. त्यांना त्यांचे नातेवाईक संतोष बलभिम कांबळे यांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, सांगोला येथे दाखल केले असता,

 तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून ते उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले.

अपघाताची फिर्याद डॉ. फुले यांनी दिली असून सांगोला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली आहे. पुढील तपास पोना. बनकर हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments