Breaking News

विठ्ठलपंत शिंदे यांची आदर्श विद्यालयाच्या नियमित मुख्याध्यापकपदी नियुक्ती

विठ्ठलपंत शिंदे यांची  आदर्श विद्यालयाच्या नियमित मुख्याध्यापकपदी नियुक्ती 


सांगोला (प्रतिनिधी ): येथील  आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाच्या नियमित प्राचार्यपदी विठ्ठलपंत शिंदे सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेने यांची मुख्याध्यापकपदासाठी निवड केली.

 शिक्षण विभाग (माध्यमिक) सोलापूर नियुक्ती यांचे अधिकृत मान्यता पत्र प्राप्त होताच ते पंचायत समितीच्या सदस्या राणीताई पाटील ,अजिंक्यतातरा पतसंस्थेचे चेअरमन गिरिशभाऊ नष्टे  यांच्या हस्ते विठ्ठलपंत शिंदे सर यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

विठ्ठलपंत शिंदे सर हे अनुभवी,  तसेच शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेले सहशिक्षक आहेत. ते विद्यालयाच्या हिंदी , मराठी विभागात सहशिक्षक म्हणून कार्यरत असून 

अध्यापनासोबतच संशोधन, विद्यार्थी विकास आणि प्रशालेच्या प्रशासनातील विविध उपक्रमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेष करून संस्थेच्या उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल दखल घेतल्याचे दिसून आले.

विठ्ठलपंत शिंदे सर यांच्या नियुक्तीमुळे वामनराव शिंदे साहेब विद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय वाटचालीला नवी दिशा मिळून  गुणवत्ता, नवोपक्रम आणि विद्यार्थी विकासाच्या क्षेत्रात विद्यालयाची कामगिरी अधिक उंचावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

विठ्ठलपंत शिंदे सर यांच्या नियुक्तीबद्दल संस्थेचे अध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम , सचिव निलकंठ शिंदे सर , उद्धव पाटील , किशोर बनसोडे सर्व संचालक मंडळ व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कुंभार सर यांनी केले

Post a Comment

0 Comments