सर्व समाजाच्या कल्याणासाठी मुस्लिम बांधवांची विशेष दुआ; समाधानकारक पावसासाठी सामूहिक नमाज पठण
सांगोला | प्रतिनिधी : सर्व समाजाच्या सुख-शांती, समृद्धी आणि कल्याणासाठी तसेच समाधानकारक पाऊस पडावा,
यासाठी मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज पठण करून विशेष दुआ केली. या वेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच विविध भागांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामूहिक नमाज पठणानंतर करण्यात आलेल्या विशेष दुआमध्ये सर्व समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली.
पावसाअभावी निर्माण होणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, शेतीला चांगला पाऊस मिळावा आणि नागरिकांचे जीवन सुख-समाधानाने जावे, अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली.
या उपक्रमातून सामाजिक सलोखा, एकोपा आणि सर्वधर्मीयांच्या कल्याणाची भावना अधोरेखित झाली.
यावेळी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप गुरव, गोपनीयचे अमोले वाडकर,
पो. हे. कॉ. येडगे, वाघमोडे यांनी चोख बंदोबस्त बजावला तर सदर सामूहिक नमाज पठण यशस्वी करण्यासाठी फिरोज खतीब,
सोहेल इनामदार, कादिर इनामदार, तोफिक मुजावर, साहिल खतीब, रफिक नदाफ, मोहसीन मुजावर, दिलावर मुजावर यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी हाजी शब्बीर खतीब, मौलाना अब्दुल हाई, शौकत खतीब, उस्मान इनामदार, अखिल काझी, हाजी इब्राहिम मुल्ला,
हाजी युसुफ मुल्ला, बशीर तांबोळी, नूर काझी, रियाज मुजावर यांच्यासह मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि विविध भागांतील नागरिक उपस्थित होते.


0 Comments