Breaking News

सरपंचांची खुर्ची रिकामी; ६१ ग्रामपंचायतींवर अधिकाऱ्यांची एंट्री! उच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रशासक नियुक्ती ; ग्रामपंचायतींचा कारभार शासकीय अधिकाऱ्यांकडे

सरपंचांची खुर्ची रिकामी; ६१ ग्रामपंचायतींवर अधिकाऱ्यांची एंट्री! उच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रशासक नियुक्ती ; ग्रामपंचायतींचा कारभार शासकीय अधिकाऱ्यांकडे


सांगोला | प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील मुदत संपलेल्या ६१ ग्रामपंचायतींच्या कारभारावर अखेर शासकीय अधिकाऱ्यांची 

नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य शासनाने १० सप्टेंबर रोजी प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले.

 त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रशासक नियुक्तीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, 

संबंधित ग्रामपंचायतींचा कारभार आता शासकीय सेवेतील द्वितीय श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या हाती गेला आहे.

सांगोला तालुक्यात यापूर्वी ७६ ग्रामपंचायती होत्या.

 नव्याने बुरलेवाडी ग्रामपंचायतीची निर्मिती झाल्याने ग्रामपंचायतींची संख्या ७७ झाली आहे. यापैकी निवडणुका होऊन मुदत संपलेल्या ६१ ग्रामपंचायतींवर 

यापूर्वी संबंधित सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही व्यवस्था बदलण्यात आली 

असून आता शासकीय अधिकाऱ्यांकडे प्रशासकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

कोणत्या अधिकाऱ्याकडे कोणत्या ग्रामपंचायती ?

कृषी अधिकारी एन. एच. बाबर यांच्याकडे जवळा, बामणी, वाटंबरे व हातीद या ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. विस्तार अधिकारी ए. यू. तोडकरी 

यांच्याकडे आगलावेवाडी, घेरडी, मानेगाव, लोणविरे, गौडवाडी, महूद बुद्रुक, मांजरी, वासूद, उदनवाडी व हंगिरगे या ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आला आहे. 

शाखा अभियंता ए. एन. कोष्टी यांच्याकडे बुरंगेवाडी, शाखा अभियंता एस. एस. पुकळे यांच्याकडे भोपसेवाडी व तरंगेवाडी,

 तर कृषी विस्तार अधिकारी ए. एच. पवार यांच्याकडे संगेवाडी व आलेगाव ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. 

शाखा अभियंता पी. के. महाजन यांच्याकडे हणमंतगांव व निजामपूर ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आला आहे.

आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी  एम. एस. सावंत  यांच्याकडे एखतपूर, आचकदानी, 

वझरे व राजुरी या ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी  ए. यू. भंडारे  यांच्याकडे किडबिसरी, यलमार मंगेवाडी, मेडशिंगी, 

अकोला, कडलास, वाणीचिंचाळे जुजारपूर, हटकर मंगेवाडी व तिप्पेहाळी या ग्रामपंचायतींचा कारभार देण्यात आला आहे. 

कृषी विभागाचे विस्तार अधिकारी आर. एस. मिसाळ  यांच्याकडे पारे, डिकसळ व नराळे; कनिष्ठ अभियंता आर. वाय. चौगुले  यांच्याकडे अजनाळे व बुरलेवाडी; 

तर कृषी विस्तार अधिकारी बी. डी. खटकाळे यांच्याकडे पाचेगाव बुद्रुक, वाकी व घेरडी या ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 विस्तार अधिकारी ए. एस. कोळी यांच्याकडे डोंगरगाव, लोटेवाडी, इटकी, महिम, वाकी व शिवणे या ग्रामपंचायतींचा कारभार आहे. 

शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी एस. बी. नवले  यांच्याकडे चोपडी, खिलारवाडी, हलदहिवडी, गायगव्हाण व नाझरे या ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. 

विस्तार अधिकारी  पी. जी. गायकवाड  यांच्याकडे लक्ष्मीनगर, तर संबंधित विस्तार अधिकाऱ्यांकडे जुनोनी, कोळे व कमलापूर या ग्रामपंचायतींचा कारभार देण्यात आला आहे.

विस्तार अधिकारी  पी. एस. गंगदे  यांच्याकडे धायटी, कटफळ व शिरभावी; शाखा अभियंता रमेश विटेकर  यांच्याकडे सोमेवाडी; 

तर शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी एल. पी. कुमठेकर  यांच्याकडे देवळे ग्रामपंचायतीची प्रशासक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

निधीवाटप व प्रशासकीय अधिकारही

नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांना ग्रामपंचायतीच्या  निधीवाटपासह प्रशासकीय कामकाजासाठी आवश्यक अधिकार देण्यात आले आहेत. 

त्यामुळे ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्याची मोठी जबाबदारी आता प्रशासक आणि ग्रामसेवकांवर राहणार आहे.

  ६१ ग्रामपंचायतींच्या कारभारात मोठा बदल    सरपंचांच्या माध्यमातून सुरू असलेला कारभार बदलून आता शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली ग्रामपंचायतींचे कामकाज होणार आहे. 

त्यामुळे आगामी काळात विकासकामे, निधीवाटप, प्रशासकीय निर्णय आणि ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कारभाराकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments