भक्ती, संस्कार अन् समाजसेवेचा त्रिवेणी संगम; ‘शारदाई वात्सल्य धाम’मध्ये एकादशीचा भक्तिमय सोहळा
जवळे | प्रतिनिधी : जवळे येथे आजी-आजोबांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेले ‘शारदाई वात्सल्य धाम’ हे श्रद्धा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी केंद्र ठरत आहे.
दर महिन्याच्या एकादशीला आदरणीय दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथे भक्तीभाव, पारायण आणि कीर्तनाचा धार्मिक सोहळा आयोजित केला जातो.
गणपती आरतीनिमित्त जवळे येथे आले असताना या वात्सल्य धामाला भेट देण्याचा योग आला. यावेळी कीर्तनानंतर कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीन गुणवंत मुलींचा सत्कार करण्यात आला. या सत्काराचा मान दीपक आबा साळुंखे पाटील आणि सौ. रत्नप्रभा साळुंखे पाटील यांना मिळाला.
याच कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद उपस्थितांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी क्षण ठरला.
कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर सुमारे ४०० ते ५०० भाविकांनी भक्तीभावाने फराळाचा प्रसाद घेतला. निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात अध्यात्मासोबतच संस्कार आणि सामाजिक सेवेची भावना प्रकर्षाने जाणवली.
‘शारदाई वात्सल्य धाम’ हे केवळ स्मारक न राहता श्रद्धा, संस्कार, आपुलकी आणि समाजसेवेचा अखंड प्रवाह बनत आहे,
अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. दीपक आबांनी सुरू केलेल्या या उपक्रमातून धार्मिक कार्यक्रमांसोबतच गुणवंतांचा सन्मान आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची परंपरा जपली जात आहे.




0 Comments