गणेश गायकवाड यांच्या खांद्यावर बसपाच्या सांगोला विधानसभा अध्यक्षपदाची धुरा; शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार घराघरात पोहोचवण्याचा निर्धार
सांगोला : प्रतिनिधी बहुजन समाज पार्टीच्या सांगोला विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीला वेग देत
नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत गणेशजी गायकवाड यांची सांगोला विधानसभा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गायकवाड यांनी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासह महापुरुषांच्या विचारांचे मिशन पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीस बसपाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक बबलूजी गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष मिलिंद बनसोडे आणि जिल्हा प्रभारी कुंदनजी बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कोंडीबा वायदंडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी, अजय ठोकळे यांची महासचिवपदी तर श्रीधरजी केंगार यांची कोषाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
नूतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बबलूजी गायकवाड यांनी येणाऱ्या काळात शिव-शाहू-फुले-आंबेडकर
यांची विचारधारा घराघरात पोहोचवून बहुजन समाज पार्टीची संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
महापुरुषांचे मिशन पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने प्रामाणिकपणे काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
“सांगोला विधानसभा मतदारसंघात पक्षाची संघटना तळागाळापर्यंत पोहोचवून बहुजन समाजाच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा
फोडण्यासाठी काम करणार,” असा निर्धार नूतन विधानसभा अध्यक्ष गणेशजी गायकवाड यांनी व्यक्त केला.
या बैठकीस अमोल (दादा) बनसोडे, नागा माने, अजय वाघमारे, गणेश काशीद, कुमार गवळी, सुहास बनसोडे, राजू माने, नितीन तोरणे, प्रेम मोठे, संदीप ठोकळे, साहिल कांबळे, रोहित नवघरे, बिरूदेव गाडे यांच्यासह बसपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


0 Comments