Breaking News

बाबासाहेब देशमुखांचा शेतकऱ्यांसाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे आवाज; सांगोल्यात दुष्काळ जाहीर करा!

बाबासाहेब देशमुखांचा शेतकऱ्यांसाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे आवाज; सांगोल्यात दुष्काळ जाहीर करा!


पावसाने ओढ दिली, पिके संकटात; सांगोला मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा; तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी

सांगोला | प्रतिनिधी : पावसाने मोठी ओढ दिल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यंदा सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

या पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सांगोला तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघातील सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करत शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली.

पावसाअभावी शेतातील पिकांची अवस्था बिकट झाली असून अनेक भागांतील शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. 

त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी आग्रही भूमिका आमदार देशमुख यांनी मांडली.

सांगोल्यातील शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत शासनाच्या मदतीची नितांत गरज असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.

पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत आता शासनाकडून कोणती मदत जाहीर होते, याकडे सांगोला मतदारसंघातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments