Breaking News

सांगोल्याच्या दुष्काळी परिस्थितीवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे धाव चारा छावण्या सुरू करण्यासह नीरा उजवा कालव्याचे आवर्तन १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी

सांगोल्याच्या दुष्काळी परिस्थितीवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे धाव


चारा छावण्या सुरू करण्यासह नीरा उजवा कालव्याचे आवर्तन १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी

सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी

 आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात 

तसेच नीरा उजवा कालव्याचे सध्या सुरू असलेले आवर्तन १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरू ठेवावे, अशा प्रमुख मागण्या केल्या.

यंदा सांगोला तालुक्यासह परिसरात अत्यल्प पाऊस झाल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांचे नुकसान झाले

 असून, शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघात तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, 

त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच चारा पुरवठा व व्यवस्थापनाची प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी आमदार डॉ. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

नीरा उजवा कालव्याचे आवर्तन १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी

दुष्काळी परिस्थितीचा शेतीवरही मोठा परिणाम होत असल्याने वीर धरणातून नीरा उजवा कालव्याद्वारे सुरू असलेले खरीप हंगाम २०२६-२७ चे सिंचन आवर्तन वेळेपूर्वी बंद करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.

नीरा उजवा कालव्याचे आवर्तन १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरू ठेवावे, जेणेकरून सांगोला तसेच संबंधित पंढरपूर तालुक्यातील भागातील उभी पिके वाचविण्यास मदत होईल, अशी भूमिका आमदारांनी मांडली.

याशिवाय चिंचोली तलाव (ता. सांगोला), तिसंगी व सोनके (ता. पंढरपूर) या तलावांमध्ये आवश्यकतेनुसार पाणी सोडण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.

 या तलावांमध्ये पाणी उपलब्ध झाल्यास शेतीसह आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

मुख्यमंत्र्यांकडून मागण्यांची दखल

शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांच्या हिताचा विचार करून चारा छावण्या, सिंचनाचे आवर्तन आणि 

तलावांमध्ये पाणी सोडण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांच्या मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या असून, याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी सिंचनाचे पाणी आणि पशुधनासाठी चारा-पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने

 आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या या मागण्यांकडे आता शासनाकडून होणाऱ्या निर्णयाकडे शेतकरी व पशुपालकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments