बुद्धेहाळ येथे सुपर-20 अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्घाटन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते बुद्धेहाळ येथे सुपर-20 अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्घाटन
बुद्धेहाळ, सांगोला | वार्ताहर - माननीय पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण श्री अतुल कुलकर्णी सर यांनी आज बुद्धेहाळ येथे UPSC, MPSC तसेच सर्व स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास व तयारीसाठी श्री सूर्यकांत लवटे, विधी सल्लागार,
महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्यातून सुपर-20 अभ्यासिका कक्ष व ग्रंथालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी बुद्धेहाळ गावात वृक्षारोपण करण्यात आले.
ग्रंथालयाच्या उद्घाटन प्रसंगी अतुल कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. योग्य मार्गदर्शन, चिकाटी, कष्ट हा यशाचा मार्ग आहे
असा कानमंत्र याप्रसंगी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना दिला. स्वतः देखील एका छोट्या गावातून प्रवास सुरू केल्याचे सांगून त्यांच्या स्पर्धा परीक्षा तयारीचे अनुभव सांगितले.
नवोदित विद्यार्थ्यांना सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवा (IPS) उत्तीर्ण अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी बुद्धेहाळ गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*उद्धृत:*
_"चिकाटी आणि कष्ट हाच यशाचा मंत्र"_
*- अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण*


0 Comments