आरोग्यदूत ठरले आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख; किडनी प्रत्यारोपणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून दिल्याबद्दल नवले कुटुंबीयांकडून आभार
सांगोला : एखतपूर (ता. सांगोला) येथील सुभाष नामदेव नवले यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची अत्यंत
महत्त्वाची आणि खर्चिक वैद्यकीय उपचार प्रक्रिया सुरू असताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी तत्परतेने पुढाकार घेत मदतीचा हात दिला.
त्यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत मिळाल्याने नवले कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
किडनी प्रत्यारोपणासारख्या गंभीर उपचारासाठी मोठ्या आर्थिक खर्चाची आवश्यकता असताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला.
उपचार सुरू असतानाच वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध झाल्याने नवले कुटुंबावरील आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला.
संकटाच्या काळात लोकप्रतिनिधीने नागरिकाच्या मदतीसाठी खंबीरपणे उभे राहून आवश्यक सहकार्य करणे, याचा अनुभव या प्रसंगातून आल्याचे सुभाष नवले यांनी सांगितले.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दाखविलेली तत्परता, संवेदनशीलता आणि सहकार्य आपल्यासाठी अत्यंत मोलाचे ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
“आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आमच्यावरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी झाला.
संकटाच्या काळात त्यांनी दिलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल नवले कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार,” असे सुभाष नामदेव नवले यांनी म्हटले.
आरोग्यविषयक अडचणीच्या काळात केलेल्या या मदतीबद्दल नवले कुटुंबीयांनी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे आभार व्यक्त केले आहेत.


0 Comments