Breaking News

वाटंबरेत विकासकामांचा धडाका! आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन

वाटंबरेत विकासकामांचा धडाका! आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन


वाटंबरे : गावातील विविध विकासकामांना गती मिळत असून, आलदरवस्ती रस्ता, पोपट शिंदे मळा रस्ता तसेच विविध ठिकाणच्या विद्युत 

डीपी व ट्रान्सफॉर्मरच्या कामांचे उद्घाटन लोकप्रिय आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.

यावेळी आलदरवस्ती रस्ता, पोपट शिंदे मळा रस्ता, फडतरे डीपी, साळुंखे वस्ती डीपी, शिंदे मळा डीपी तसेच वीज वितरण ट्रान्सफॉर्मर या विविध विकासकामांचा समावेश होता.

उद्घाटन सोहळ्यास वाटंबरे गावातील असंख्य युवक, कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी तसेच तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विकासकामांच्या उद्घाटनामुळे गावातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वाटंबरेच्या विकासाला चालना मिळत असल्याची भावना व्यक्त केली. 

गावाच्या विविध गरजा आणि विकासकामे मार्गी लागण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

वाटंबरेच्या विकासाचा हा प्रवास पुढेही असाच सुरू राहावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments