तिप्पेहळीत किराणा दुकानावर चोरट्यांचा डल्ला; पत्रा कापून २८ हजारांचा माल लंपास काजू-बदाम, खाद्यतेल, मसाले, बिस्कीटांसह ७ हजारांची रोकड चोरी; महामार्गालगतच्या घटनेने परिसरात खळबळ
सांगोला : तिप्पेहळी (ता. सांगोला) येथे मिरज-पंढरपूर महामार्गालगत असलेल्या ‘गणराज किराणा स्टोअर्स’ या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला. दुकानाच्या पत्र्याला कापून आत प्रवेश करत
चोरट्यांनी रोख रकमेसह मोठ्या प्रमाणात किराणा साहित्य लंपास केले. या चोरीत तब्बल २८ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. ही घटना ७ ऑगस्टच्या रात्रीपासून ८ ऑगस्टच्या पहाटेपर्यंत घडली.
याप्रकरणी किरण हणमंत नरळे (वय २२, रा. तिप्पेहळी) यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुकान बंद करून गेले अन् सकाळी उघडकीस आली चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, तिप्पेहळी येथील शिव वस्ती परिसरात मिरज-पंढरपूर महामार्गालगत नरळे यांचे ‘गणराज किराणा स्टोअर्स’ हे पत्र्याचे दुकान आहे. ७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता दुकान बंद करून नरळे कुटुंबीय घरी गेले.
दुसऱ्या दिवशी ८ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ६ वाजता किरण नरळे दुकानाकडे गेले. त्यावेळी दुकानाच्या डाव्या बाजूचा पत्रा वाकलेला दिसला. जवळ जाऊन पाहणी केली असता पत्रा कापून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले.
काऊंटरमधील रोकडही गायब
दुकानाचे शटर उघडल्यानंतर आतमधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळले. काऊंटर व ड्रॉवर तपासले असता ३ हजार रुपये रोख गायब असल्याचे निदर्शनास आले.
तसेच पाकिटातील ४ हजार रुपये, पॅनकार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सही चोरीला गेल्याचे समोर आले.


0 Comments