Breaking News

वाढदिवसाचे औचित्य साधत हरित संदेश; उद्योगपती प्रमोददादा साळुंखे-पाटील यांच्याकडून वृक्षरोपांचे योगदान

वाढदिवसाचे औचित्य साधत हरित संदेश; उद्योगपती प्रमोददादा साळुंखे-पाटील यांच्याकडून वृक्षरोपांचे योगदान


सांगोला | प्रतिनिधी सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम सांगोल्यात पार पडला. सांगोला नगरपरिषद व नगराध्यक्ष आनंदा भाऊ माने यांनी राबविलेल्या 

'हरित सांगोला' अभियानाला प्रतिसाद देत युवा उद्योगपती प्रमोददादा साळुंखे-पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषदेला वृक्षरोपांचे योगदान दिले.

या उपक्रमाअंतर्गत गुरुवारी एसटी बसस्थानकाच्या परिसरातील भिंतीलगत वृक्षारोपण करण्यात आले. नगराध्यक्ष आनंदा भाऊ माने, युवक नेते डॉ. पियूषदादा साळुंखे-पाटील,

 नगरसेवक काशिलिंग (बाबू) गावडे, साहिलभाई इनामदार, गरंडे, बापू देवकते, आरिफभाई मुलाणी तसेच प्रमोददादा साळुंखे-पाटील मित्र परिवार यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली.

वाढदिवस साजरा करण्यासाठी केवळ औपचारिक कार्यक्रमांवर भर न देता पर्यावरणपूरक उपक्रमाची निवड केल्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. 

शहर अधिक हिरवेगार करण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेकडे वृक्षरोपे सुपूर्द करत प्रमोददादा साळुंखे-पाटील यांनी पर्यावरण संवर्धनासाठी आपले योगदान दिले.

नगराध्यक्ष आनंदा भाऊ माने व नगरपरिषदेच्या पुढाकारातून सुरू असलेल्या हरित सांगोला अभियानाला अशा सामाजिक सहभागामुळे अधिक बळ मिळत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

 वाढदिवसानिमित्त भेटवस्तूंऐवजी वृक्षरोपे देण्याची संकल्पना समाजासाठी प्रेरणादायी असून नागरिकांनीही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन

 सांगोला अधिक हिरवेगार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नगरसेवक काशिलिंग (बाबू) गावडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments