सोलापूर जिल्ह्यात शिवसेना संघटनात्मक बांधणीला वेग; ७ ते ९ ऑगस्टदरम्यान सुषमा अंधारे यांचा दौरा
सोलापूर | प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाला अधिक गती
देण्यासाठी शिवसेना उपनेत्या तथा संपर्क प्रमुख सुषमा अंधारे या ७ ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात त्या विधानसभा मतदारसंघनिहाय आयोजित आढावा बैठकींना उपस्थित राहून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांशी थेट संवाद साधणार आहेत.
या बैठकींमध्ये पक्ष संघटनेची सद्यस्थिती, आगामी राजकीय नियोजन, बूथस्तरावरील बांधणी तसेच पक्ष
विस्ताराबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना तसेच पक्षाच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठका यशस्वी कराव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील संघटनात्मक बळकटीसाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार असून, आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीनेही या बैठकींकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.


0 Comments