Breaking News

वाटंबरेत आज मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा; ४० एकर परिसरात पार्किंगची व्यवस्था सभेची जय्यत तयारी पूर्ण; एलसीडी स्क्रीनसह नागरिकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था

वाटंबरेत आज मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा; ४० एकर परिसरात पार्किंगची व्यवस्था सभेची जय्यत तयारी पूर्ण; एलसीडी स्क्रीनसह नागरिकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था


सांगोला | प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने भूमिका मांडणारे मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 

आज, रविवार (९ ऑगस्ट) रोजी दुपारी ३ वाजता वाटंबरे (ता. सांगोला) येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 सभेच्या पार्श्वभूमीवर वाटंबरे परिसरात तयारीला वेग आला असून, सभा यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडून विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात आले आहे.

सभेसाठी तालुक्यातील तसेच परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने वाहनतळाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

 एसटी स्टँड चौकाजवळ चारचाकी वाहनांसाठी तब्बल ३० ते ४० एकर परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

सभेतील कार्यक्रम उपस्थितांना व्यवस्थित पाहता व ऐकता यावा यासाठी एलसीडी स्क्रीनचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

 तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्थानिक कार्यकर्ते आणि रहिवासी विविध व्यवस्थांवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला होणारी गर्दी लक्षात घेता सभेच्या ठिकाणी नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली

 असून, वाटंबरे येथील या सभेकडे सांगोला तालुक्यासह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments