Breaking News

आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या कार्यशैलीची राज्यभर चर्चा; जनतेशी सातत्यपूर्ण संपर्क आणि अभ्यासू कामगिरीमुळे वाढला विश्वास

आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या कार्यशैलीची राज्यभर चर्चा; जनतेशी सातत्यपूर्ण संपर्क आणि अभ्यासू कामगिरीमुळे वाढला विश्वास


सांगोला : प्रतिनिधी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख (आबासाहेब) 

यांनी अनेक दशकांच्या सार्वजनिक जीवनात विकासाभिमुख, पारदर्शक आणि लोकाभिमुख राजकारणाचा आदर्श निर्माण केला.

 त्यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे काम आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख करत असून, 

त्यांच्या कार्यपद्धतीची राज्यभर चर्चा होत असल्याचे मत शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी व्यक्त केले.

सरतापे म्हणाले की, स्व. आबासाहेब देशमुख यांच्या निधनानंतर डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोल्यात राहून जनतेशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली. सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी नागरिकांच्या पाठीशी उभे राहत

 त्यांनी सर्वसामान्यांशी दृढ नाते निर्माण केले. पक्षाने त्यांच्यावर युवक संघटनेच्या 

प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर राज्यभर युवकांशी संपर्क वाढवत त्यांनी जनाधार अधिक मजबूत केला.

याच विश्वासाच्या बळावर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेच्या आग्रहास्तव त्यांनी निवडणूक लढवली

 आणि मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला. राजकारणातील अनुभवाबाबत अनेकांनी शंका व्यक्त केल्या होत्या. 

मात्र, आमदार झाल्यानंतर त्यांनी अभ्यासू वृत्ती, प्रभावी मांडणी आणि जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली बांधिलकी यामुळे त्या सर्व शंकांचे निरसन आपल्या कामगिरीतून केले.

विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात सांगोला मतदारसंघाशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडत त्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. 

त्यांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घेतले 

असून, काही प्रश्न मार्गी लागण्याच्या प्रक्रियेत आहेत. उर्वरित प्रश्नांसाठीही ते सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सरतापे यांनी सांगितले.

मतदारसंघातील विकासकामांसाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि विविध खात्यांतील 

मंत्र्यांशी समन्वय राखत विकास निधी आणि प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी आमदार देशमुख सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 आठवड्यातील मंगळवार आणि बुधवार या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहून विकासकामांचा पाठपुरावा करण्याची त्यांची कार्यपद्धती जनतेसाठी लाभदायक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय राज्य सरकारच्या महत्त्वपूर्ण समित्यांवर काम करताना जनतेच्या हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे कामही ते करत आहेत. 

विकासकामांसोबतच मतदारसंघातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठीही ते सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सरतापे यांनी सांगितले.

लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम, विविध समाजांचे उपक्रम, राष्ट्रपुरुषांच्या जयंती, शालेय व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा तसेच दुःखद प्रसंगी संबंधित कुटुंबीयांना भेट देऊन आधार देणे, 

अशा प्रत्येक सामाजिक घटनेत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख सक्रिय सहभाग घेत असल्यामुळे जनतेशी त्यांचे नाते अधिक दृढ झाले आहे.

जनसंपर्क, अभ्यासू नेतृत्व, विकासकामांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सर्वसामान्यांशी कायम असलेला संवाद या गुणांमुळे आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या कार्यपद्धतीची चर्चा 

आज केवळ सांगोल्यापुरती मर्यादित न राहता राज्यभर होत असल्याचे मत भाई चंद्रकांत सरतापे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments