विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज विरोधात महाराष्ट्र विकास सेना आक्रमक;
काळ्या फिती बांधून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!
अकलूज: महाराष्ट्र विकास सेना पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर २० जुलै २०२६ रोजी प्रशासनाने केलेल्या अमानुष लाठीचार्जचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत.
या हिंसक कारवाईचा तीव्र निषेध करत 'महाराष्ट्र विकास सेना' पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या दंडाला काळ्या फिती बांधून सरकारचा तीव्र निषेध केला.
या आंदोलनानंतर त्यांनी थेट देशाच्या राष्ट्रपतींकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली असून, या संदर्भातील निवेदन आज २१ जुलै २०२६ रोजी माळशिरसचे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आले आहे. सदर निवेदन श्री किशोर काळकुटे यांनी
स्वीकारले.यावेळी प्रदेश सचिव अनिल साठे,संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,तालुका अध्यक्ष धनाजी पाटील,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे
युवा सेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे, माढा विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे,सतीश साठे,विशाल सरतापे,सागर सरतापे,महादेव साठे,अजय माने किरण खंडागळे,
सचिन पाटोळे, रफिक मुलाणी सैलनी सय्यद विकास केसकर,बंडू कांबळे सुमित कांबळे,लक्ष्मण चव्हाण, विशाल साठे,कृष्णा खवळे रितेश सरवदे,दयानंद पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित होते.
पेपर लीक आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना सरकार जबाबदार!महाराष्ट्र विकास सेनेचे प्रदेश सचिव श्री.अनिल तानाजी साठे यांच्या नेतृत्वाखाली दंडाला काळ्या फिती बांधून प्रशासकीय हुकूमशाहीवर कडाडून हल्ला चढवण्यात आला. देशातील 'NEET' परीक्षेतील प्रचंड घोटाळा, वारंवार होणारे
पेपर लीक आणि 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' (NTA) चे अपयश यामुळे शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. या ढिसाळ कारभारामुळे निराश होऊन अनेक निष्पाप विद्यार्थ्यांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे,
असा संतप्त आरोप पक्षाने केला आहे.लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे.
जर त्यांनी राजीनामा दिला नाही, तर त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात यावे," अशी आक्रमक मागणी निवेदनात करण्यात आली आहे.तसेच सोनम वांगचूक,अभिजित दिपके आणि
विद्यार्थी संघटनांनी शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी मांडलेल्या सर्व मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात, अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे.लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा!लोकशाही मार्गाने संसद
भवनाकडे मार्च करणाऱ्या निशस्त्र विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची चौकशी करण्याची मागणीही पक्षाने केली आहे.
"शांततापूर्ण आंदोलनाचा आवाज दाबण्यासाठी पोलीस बळाचा आणि हुकूमशाही मार्गाचा वापर करणे अत्यंत लाजीरवाणे आहे. यामुळेच आम्ही काळ्या फिती बांधून या जुलमी प्रशासनाचा निषेध करत आहोत," असे निवेदनात म्हटले
आहे.शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा न घेतल्यास आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास हे आंदोलन केवळ दिल्लीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशभर अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र विकास सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.


0 Comments