Breaking News

दिल्लीतील आंदोलनावर पोलिसी कारवाईचा शेकापकडून निषेध; संवादातून तोडगा काढण्याची डॉ. अनिकेत देशमुख यांची मागणीट

दिल्लीतील आंदोलनावर पोलिसी कारवाईचा शेकापकडून निषेध;


संवादातून तोडगा काढण्याची डॉ. अनिकेत देशमुख यांची मागणी

सांगोला | प्रतिनिधी नवी दिल्ली येथे शिक्षण व्यवस्था, परीक्षा घोटाळे आणि विविध जनहिताच्या मागण्यांसाठी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या

 पोलिसी कारवाईचा शेतकरी कामगार पक्षाने तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेला 

लाठीचार्ज, अश्रुधूराचा वापर आणि दडपशाहीची भूमिका ही लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी असल्याची प्रतिक्रिया शेकापचे चिटणीस मंडळ सदस्य डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली.

डॉ. देशमुख यांनी म्हटले की, भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा आणि आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचा अधिकार दिला आहे. 

अशा परिस्थितीत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करणे ही लोकशाही व्यवस्थेला न शोभणारी बाब आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांवरील दडपशाही तात्काळ थांबवून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

शिक्षण, परीक्षा व्यवस्था तसेच युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने गांभीर्याने विचार करून न्याय्य तोडगा काढावा, असेही त्यांनी नमूद केले.

लोकशाहीची खरी ताकद ही संवाद, सहिष्णुता आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीत आहे. त्यामुळे सरकारने संघर्षाचा मार्ग न स्वीकारता चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांनी केले.

– डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख

चिटणीस मंडळ सदस्य, शेतकरी कामगार पक्ष (शेकाप)

अध्यक्ष, सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला

Post a Comment

0 Comments