Breaking News

यलमर मंगेवाडीतील खंडोबा मंदिर–महादेव मिसाळ वस्ती रस्त्यासाठी १० लाखांचा निधी; ग्रामस्थांच्या मागणीला अखेर न्याय

यलमर मंगेवाडीतील खंडोबा मंदिर–महादेव मिसाळ वस्ती रस्त्यासाठी १० लाखांचा निधी; ग्रामस्थांच्या मागणीला अखेर न्याय


सांगोला, दि. ३ जुलै : सांगोला तालुक्यातील मौजे यलमर मंगेवाडी येथील खंडोबा मंदिर ते महादेव मिसाळ वस्ती या महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा योजनेअंतर्गत १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 या निधीमुळे अनेक वर्षांपासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

महादेव मिसाळ वस्ती ते कमलापूर–अजनाळे मार्गाला जोडणारा हा रस्ता खराब अवस्थेत असल्याने पावसाळ्यात वाहतूक विस्कळीत होत होती. 

शेतमाल बाजारपेठेत नेणे, विद्यार्थ्यांना शाळेत जाणे तसेच दैनंदिन प्रवास करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती.

ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत आमदार शहाजीबापू पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीकडे सातत्याने पाठपुरावा केला.

 त्यानंतर जनसुविधा योजनेतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली.

याबाबत बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, "तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्तीला दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणे हे माझे प्राधान्य आहे. महादेव मिसाळ वस्तीतील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असल्याचा आनंद आहे."

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर यलमर मंगेवाडी, कमलापूर, अजनाळे तसेच परिसरातील सुमारे २०० ते २५० शेतकरी कुटुंबांना दळणवळणाची मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

 निधी मंजूर झाल्याबद्दल ग्रामस्थांनी पालकमंत्री, जिल्हा नियोजन समिती आणि आमदार शहाजीबापू पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment

0 Comments