Breaking News

चेतनसिंह केदार सावंत यांच्या उपस्थितीत आषाढी वारी आरोग्य नियोजनाचा आढावा; जिल्हा परिषद यंत्रणा सज्ज

चेतनसिंह केदार सावंत यांच्या उपस्थितीत आषाढी वारी आरोग्य नियोजनाचा आढावा; जिल्हा परिषद यंत्रणा सज्ज


आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा अलर्ट; वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोलापूर जिल्हा परिषद सज्ज

कासेगाव येथे नियोजन बैठक; आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका व आपत्कालीन सेवांचा सविस्तर आढावा

कासेगाव (पंढरपूर), दि. ३ जुलै : आषाढी वारीदरम्यान लाखो वारकऱ्यांना अखंड, तत्पर आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी

 सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले असून, त्याबाबतची आढावा बैठक कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पार पडली.

भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वारी मार्गावरील आरोग्य सेवेच्या विविध बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.

 वैद्यकीय पथकांची नियुक्ती, औषधसाठा, रुग्णवाहिका व्यवस्था, आपत्कालीन उपचार सेवा, चरण सेवा, मुख्यमंत्री वारकरी सुविधा उपचार केंद्र, मुख्यमंत्री 

वारकरी निवारा उपचार केंद्र, मुख्यमंत्री आरोग्य रथ, आरोग्यदूत, मेडिसिन किट, उष्माघात व संसर्गजन्य आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच स्वच्छतेच्या कामांवर विशेष भर देण्यात आला.

यावेळी प्रत्येक पालखीसोबत अत्याधुनिक ALS रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. वारकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत

 तातडीने उपचार मिळावेत, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि सतर्कतेने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी बोलताना सभापती चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, "आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि सेवाभावाचे प्रतीक आहे. 

लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून प्रत्येक वारकऱ्याला वेळेवर, सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सज्ज आहे."

बैठकीस आरोग्य समिती सदस्य व्यंकटराव भालके, नागनाथ भोसले, शोभाताई खटकाळे, सविताताई कोकाटे, संगीताताई दुधाळ, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

चौकट : वारकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य

"आषाढी वारी हा केवळ धार्मिक सोहळा नसून सेवा, समर्पण आणि संस्कृतीचा उत्सव आहे. प्रत्येक वारकऱ्याला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.

 कोणतीही आरोग्यविषयक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे," असे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments