Breaking News

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला सांगोला तालुक्यातून जाहीर पाठिंबा; विद्यार्थी, पर्यावरण व संविधानिक हक्कांसाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा

सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला सांगोला तालुक्यातून जाहीर पाठिंबा; विद्यार्थी,


पर्यावरण व संविधानिक हक्कांसाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा

सांगोला (प्रतिनिधी : शशि हातेकर) – दिल्ली येथील जंतर-मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या उपोषणाला सांगोला तालुक्यातील नागरिकांनी जाहीर नैतिक पाठिंबा व्यक्त केला आहे. 

तहसील कार्यालय, सांगोला येथे यासंदर्भात नागरिकांनी शासनाला निवेदन देत आंदोलनातील मागण्यांवर तातडीने सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी केली.

निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांसह पेपरफुटीच्या घटनांमुळे होणारे नुकसान, पर्यावरण संरक्षण, संविधानिक हक्कांचे रक्षण आणि लोकशाही मूल्यांचे जतन या अत्यंत महत्त्वाच्या विषयांकडे शासनाने 

गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. या सर्व प्रश्नांवर न्याय्य व कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी त्वरित चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात यावा.

नागरिकांनी स्पष्ट केले की, हा संघर्ष केवळ एका व्यक्तीचा नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा, संविधानाने दिलेल्या अधिकारांचा आणि लोकशाही व्यवस्थेच्या संरक्षणाचा आहे.

 त्यामुळे शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाचा आदर राखून शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी.

सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या वतीने या आंदोलनाला नैतिक व जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला असून, विद्यार्थी व जनहिताच्या प्रश्नांवर शासनाने विलंब न लावता ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments