Breaking News

पुण्यातील स्वागत समारंभात आ. दीपकआबा साळुंखे-पाटील यांची शरद पवारांशी सदिच्छा भेट; नवदाम्पत्याला दिल्या शुभेच्छा

पुण्यातील स्वागत समारंभात आ. दीपकआबा साळुंखे-पाटील यांची शरद पवारांशी सदिच्छा भेट; नवदाम्पत्याला दिल्या शुभेच्छा


सांगोला | प्रतिनिधी पुण्यातील डी.पी. रोडवरील पंडित फार्म येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभात 

सांगोल्याचे आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्य रेवती सुळे व सारंग लखानी यांना शुभेच्छा दिल्या.

देशाचे ज्येष्ठ नेते, पद्मभूषण खासदार शरदचंद्र पवार व सौ. प्रतिभाताई पवार यांची नात, तसेच खासदार सुप्रिया सुळे व श्री. सदानंद सुळे यांची कन्या रेवती आणि

 आमदार अरुणराव लखानी व सौ. वंदनाताई लखानी यांचे सुपुत्र सारंग यांच्या विवाहानिमित्त आयोजित स्वागत समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी नवदाम्पत्याला भेटून त्यांच्या भावी वैवाहिक जीवनासाठी सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

समारंभादरम्यान आ. साळुंखे-पाटील यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी सदिच्छा भेट झाली. पवार यांनी अत्यंत आत्मीयतेने त्यांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली.

 या भेटीत झालेला स्नेहपूर्ण संवाद आणि पवार यांचे प्रेमळ मार्गदर्शन कायम प्रेरणादायी असल्याची भावना आ. साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केली.

विवाह स्वागत समारंभ आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, उपस्थित मान्यवरांनी नवदाम्पत्याच्या उज्ज्वल आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Post a Comment

0 Comments