Breaking News

खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून रुग्णांसाठी सुवर्णसंधी; वर्धापन दिनानिमित्त अल्प दरात शस्त्रक्रिया, मोफत उपचार योजना आणि ५०% पर्यंत सवलत!

खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून रुग्णांसाठी सुवर्णसंधी; वर्धापन दिनानिमित्त अल्प दरात शस्त्रक्रिया, मोफत उपचार योजना आणि ५०% पर्यंत सवलत!


सांगोला | प्रतिनिधी सांगोला येथील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या वैद्यकीय सेवेची १३ वर्षे यशस्वीरित्या पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रुग्णांसाठी विशेष आरोग्य सेवा उपक्रम जाहीर केला आहे. 

दि. २५ जुलै २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध शस्त्रक्रिया अल्प दरात, तर काही उपचार शासकीय योजनांअंतर्गत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY), आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, बांधकाम कामगार योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत पात्र रुग्णांना

 मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच सर्व प्रकारच्या हेल्थ इन्शुरन्स कॅशलेस सुविधाही उपलब्ध आहेत.

अल्प दरात उपलब्ध शस्त्रक्रिया

या विशेष उपक्रमात कुटुंब नियोजन, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन, गर्भाशयाची पिशवी साफ करणे, गर्भाशयाची पिशवी काढणे, अपेंडिक्स, हर्निया,

 मूळव्याध, फिशर, फिस्टुला आदी शस्त्रक्रिया विशेष सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. तसेच दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपिक) शस्त्रक्रिया देखील माफक दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

हॉस्पिटल बिलावर ५०% पर्यंत सवलत

या कालावधीत ICU तसेच इतर आजारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या हॉस्पिटल बिलावर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे. (औषधे, भूल आणि लॅबचे खर्च स्वतंत्र राहतील.)

सर्व सुविधा एकाच छताखाली

खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग, सर्जरी, मेडिसिन, अस्थिरोग, बालरोग, नेत्ररोग, त्वचा व केस रोग, कान-नाक-घसा आणि ट्रॉमा केअर अशा 

विविध विभागांमध्ये अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जातात. २४ तास आपत्कालीन सेवा देखील उपलब्ध आहे.

हॉस्पिटलचे संचालक डॉ. परेश खंडागळे आणि डॉ. स्वाती खंडागळे यांनी नागरिकांनी या विशेष सवलतींचा लाभ घेऊन वेळेत उपचार करून घ्यावेत, असे आवाहन केले आहे.

📍 पत्ता: कडलास रोड, नाका व सांगोला कॉलेजच्या मध्ये, सांगोला

📞 संपर्क: 7741807957 / 9689989090

Post a Comment

0 Comments